आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Thackeray Is Breaking House Of Balasaheb's Bodyguard, MLA Nitesh Rane Criticizes Uddhav Thackeray | Marathi News

रायगड:बाळासाहेबांच्या संरक्षकाचे घरच ठाकरे तोडत आहेत, आमदार नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

रायगड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिवाची पर्वा न करता बाळासाहेब ठाकरे यांचे संरक्षण करण्याचे काम आयुष्यभर केलेल्या नारायण राणे यांचे राहते घर तोडण्यासाठी त्यांचाच मुख्यमंत्री मुलगा उद्धव ठाकरे हे प्रयत्न करत आहेत. त्यांची ही गोष्ट जुन्या कडवट शिवसैनिकांना आवडलेली नाही. आदिश बंगल्याजवळ मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत. त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार नीलेश राणे हे बंगल्यात उपस्थित आहेत. तर मालवणच्या नीलरत्न बंगल्याबाबत अद्यापही आपल्याला कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग येथे बोलताना सांगितले.

आमदार नितेश राणे यांनी आज ओरोस पोलिस ठाण्यात हजेरी लावली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली. राणे म्हणाले, स्व. बाळासाहेब ठाकरे यांची नारायण राणे यांनी जिवाच्या पलीकडे आयुष्यभर सेवा केली. त्याबाबत कोणतीही जाणीव न ठेवता बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राणे यांचे घर तोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र हे आदेश केंद्र सरकारचे आहेत की राज्य सरकारच काही गडबड करते आहे, हे लक्षात घ्यावे लागेल, असेही नितेश राणे या वेळी म्हणाले.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला वेळ आहे, मात्र महाराष्ट्रातील जनतेला भेटायला वेळ नाही. जनतेचे प्रश्‍न सोडवायला वेळ नाही, अशी टीकादेखील त्यांनी ठाकरे आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीवर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. आदित्य ठाकरे हे येथे फोटोसेशनसाठी येत आहेत की बंगला किती पडला हे पाहायला येत आहेत, असा प्रश्न आ. राणे यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...