आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकीला काळीमा फासणारी घटना:ठाण्यात कौटुंबिक वादातून गर्भवती पत्नीला पतीने जीवंत जाळले, बाळाचा ​​​​​​​गर्भातच मृत्यू; पत्नी गंभीर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ठाण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कळवा येथे कौटुंबिक वादातून गर्भवती पत्नीला जीवंत जाळल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या गर्भातच बाळाचा मृत्यू झाला आहे.

गर्भवती पत्नीना रॉकेल टाकून जाळल्याने बाळाचा पोटातच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. अनिल चौरसिया असे आरोपी पतीचे नाव आहे.

दरम्यान, आरोपी पतीने डोंबिवलीतील एका तरुणीशी दुसरा विवाह केल्याचा आरोप आहे. त्यातून अनिल आणि त्याच्या पत्नीत वाद निर्माण झाला. 30 ऑक्टोंबर रोजी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. राग अनावर न झाल्याने अनिलने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतले आणि आग लावली. महिला गंभीररित्या भाजल्या गेली. लगेच शेजारच्यांनी पत्नीला रूग्णालयात दाखल केले.

याप्रकरणी कळवा पोलिसांनी आरोपी पतीविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 4 नोव्हेंबर पर्यंत आरोपीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...