आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपंचमी विशेष:12 फुटी किंग कोब्राचे अनेक वर्षांनी दर्शन; राज्यात गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच आढळला

सिंधुदुर्ग4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशाच्या पूर्व व दक्षिण भागात आढळतो.

हा दुर्मिळ किंग कोब्रा नागपंचमीच्या आठवडाभर अगोदर (दि. ८ ऑगस्ट) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एका गावात घराजवळील बांबूच्या राईमध्ये आढळला. महाराष्ट्रात अलीकडील काळात त्याचे काही वर्षांमध्ये प्रथमच दर्शन झाले आहे. हा साप शेजारील कर्नाटक अथवा गोव्याच्या जंगलातून आला असावा, असा जाणकारांचा अंदाज आहे. दुर्मिळ प्रजातीतील असल्याने त्याला तातडीने मूळ अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

राज्यात गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच आढळला

  • देशाच्या पूर्व व दक्षिण भागात आढळतो.
  • विषारी सापांमध्ये लांबीला सर्वाधिक व विषाच्या प्रभावात नागापेक्षा कमी,परंतु मात्रा मोठी असल्याने फार धोकादायक.
  • फणा नागापेक्षा छोटा. स्वभाव हल्ला करण्याचा नाही. डिवचल्यानंतर किंवा अडचणीत सापडल्यानंतर तो स्वसंरक्षणासाठी हल्ला करतो. ३ ते ४ फूट उंच फणा उभारतो.
  • घनदाट जंगलात राहतो व कमीत कमी माणसाच्या संपर्कात येतो.
  • अभ्यासकांच्या मते हा सर्वाधिक उत्क्रांत साप असून अतिशय दुर्मिळ असे सहचरी जीवन जगतो.
  • फक्त साप खाऊन राहतो. जवळ आलेल्या कोणत्याही हालचाल करणाऱ्या सजीवामुळे चिडतो.
बातम्या आणखी आहेत...