आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:मनमाडजवळ कार झाडाला धडकली; 4 जिवलग मित्र जागीच ठार, 1 गंभीर, नगर-मनमाड मार्गावर अनकवाडे शिवारात शेजवळजवळ काळाचा घाला

मनमाड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-मनमाड मार्गावरील अनकवाडे शिवारात शेजवळ पॉलिटेक्निकसमोर येवल्याकडून भरधाव येणारी कार झाडावर धडकून झालेल्या अपघातात मनमाड शहरातील ४ तरुण मित्र ठार झाले. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने शहरावर शोककळा पसरली. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री घडला.

या अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाचही जणांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यात तौफिक गफार शेख (२५), दिनेश राजेंद्र भालेराव (३२), गोकुळ वाल्मीक हिरे (३८), प्रवीण राजू सकट (२३, सर्व रा. मनमाड) यांचा मृत्यू झाला. अजय संतोष वानखेडे (२३, रा. सिद्धार्थ कॉलनी, मनमाड) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मालेगाव येथे उपचार सुरू आहेत. बुधवारी सकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात चार युवकांची चिकित्सा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. हे पाचही तरुण एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अपघातानंतर कारचा अक्षरश: चुराडा झाल्याचे पाहायला मिळाले.

बातम्या आणखी आहेत...