आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण प्रकरण:वैद्यकीय अधिकाऱ्यास पोलिसांकडून मारहाण प्रकरण आमदार सुरेश धस यांच्या मध्यस्तीने मिटले

आष्टी2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्य यंञनेतील अधिकारी-कर्मचारी यांनी गुरुवारी बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता

आष्टी तालुक्यातील टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल वनवे यांना चऱ्हाटा फाट्यावर बुधवारी सायंकाळी पोलिसांनी बेदम मारहान केल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ आरोग्य यंञनेतील अधिकारी-कर्मचारी यांनी गुरुवारी बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. माञ या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सुरेश धस यांनी गुरुवारी आरोग्य विभाग व पोलीस विभागातील अधिका-यांची समक्ष भेट घेऊन सामोपचाराने हा वाद मिटवल्याने आरोग्य विभागाची यंञना पुन्हा एकदा सुरळीत झाली. त्यामुळे आ. सुरेश धस यांचे जिल्ह्यास्तरातून अभिनंदन केले जात आहे.संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी सध्या पोलिस प्रशासन धडक कारवाई करीत आहेत. मात्र,अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असलेले डॉ. विशाल वनवे यांची कोणतीच खात्री न करता त्यांनाही मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली होती. या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य संघटनेच्या वतीने गुरुवारी सर्वञ कामबंद आंदोलन करण्यात आले.

यानंतर या घटनेची माहिती मिळताच आ.सुरेश धस यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी बीडचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार,पोलीस उपाधिक्षक लांझेवार,जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. गिते,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांच्यासोबत आरोग्य संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्तिक बैठक पार पडल्यानंतर आरोग्य संघटनेने पुकारलेले कामबंद आंदोलन मागे घेतले. त्यामुळे आरोग्य यंञना देखील पुर्वपदावर आली असून शुक्रवारपासून लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचे आष्टी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी सांगितले.

नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
गुरुवारी आरोग्य विभागाने बेमुदत कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतल्याने लसीकरणास आलेले नागरिक आल्या पावली परत जात असल्याचे चिञ ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात होते. माञ शुक्रवारपासून पुन्हा लसीकरण सुरळीत होणार असून आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग यांच्यात झालेला वाद आ. सुरेश धस यांच्या मध्यस्तीने मिटल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...