आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारचा मोठा निर्णय:केंद्र सरकार ED आणि CBI च्या प्रमुखांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवणार

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने आज ED आणि CBI प्रमुखांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) च्या प्रमुखांचा कार्यकाळ आता पाचवर्षापर्यंत असण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने दोन्ही संस्थांच्या प्रमुखांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढला आहे.

ED आणि CBI च्या प्रमुखांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढू शकतो.

ईडी आणि सीबीआयच्या प्रमुखांचा कार्यकाळ सध्या दोन वर्षांचा आहे. सीबीआयचे प्रमुख सुबोध जयस्वाल आणि ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा आहेत. नव्या अध्यादेशानुसार सीबीआय आणि ईडी प्रमुखांची नियुक्ती पहिल्या दोन वर्षांसाठी केली जाणार आहे. यानंतर, तीन वर्षांसाठी (1+1+1) मुदतवाढ दिली जाईल. पूर्ण पाचवर्ष ते त्या पदावर राहू शकत नाहीत.

2018 मध्ये जारी करण्यात आलेल्या नियुक्ती आदेशात नोव्हेंबर 2020 मध्ये बदल करत केंद्र सरकारने ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला होता. संजय कुमार मिश्रा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2020 मध्ये संपला होता. परंतु त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...