आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांचे उद्योग:शेतीचा अभ्यास करणाऱ्या भाजपच्या अनेक माजी मंत्र्यांचेही कंपनी उद्योग; फडणवीस सरकारच्या 14 मंत्र्यांच्या नावे 41 कंपन्या

औरंगाबाद, नाशिक4 महिन्यांपूर्वीलेखक: दीप्ती राऊत/महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • टॉप 5 कंपनीदार माजी मंत्री; उद्योग, बांधकाम क्षेत्रात सर्वाधिक कंपन्या

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या खासगी आणि कौटुंबिक कंपन्यांच्या "विकासा'प्रमाणेच मागील सरकारमधील भाजपच्या माजी मंत्र्यांच्या कंपन्यांची संख्याही कमी नाही. माजी मंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेले व्यवसाय आणि त्यांच्या नावावर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स या विभागाकडे दाखल कंपन्यांबाबत "दिव्य मराठी'ने केलेली ही पडताळणी. आघाडी सरकारमधील मंत्र्यांप्रमाणे मागील मंत्रिमंडळातही "शेती व उद्योग' हाच व्यवसाय बहुतांश मंत्र्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केला होता. प्रत्यक्षात, ते संचालक असलेल्या कंपन्यांपैकी ३४% कंपन्या "उद्योग' क्षेत्राशी संबंधित असल्याचे दिसते.

विविध कंपन्यांत संचालक असलेले माजी मंत्री
१. आशिष शेलार ३ कंपन्या
२. परिणय फुके ३ कंपन्या
३. सुरेश खाडे ३ कंपन्या
४. प्रविण पोटे २ कंपन्या
५. डॉ अनिल बोंडे १ कंपनी
६. गिरिष महाजन १ कंपनी
७. डॉ. रणजीत पाटील १ कंपनी
८. प्रकाश मेहता १ कंपनी

शेतकरी आत्महत्या होणाऱ्या राज्यात मंत्र्यांच्या शेती कंपन्यांचे उदंड पीक :

असे वृत्त ‘दिव्य मराठी’ ने १० ऑगस्ट रोजी प्रकाशित केले होते. त्या वृत्तातील मजकुराबाबत राज्यमंत्री बच्चू कडू आणि भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे याच्या प्रतिक्रिया...

आम्ही जनहितार्थ स्थापन केल्या कंपन्या
शेतकऱ्यांच्या मालास बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने अॅग्रो इंडस्ट्रीची गरज होती. त्याच उद्देशाने आम्ही या कंपन्या स्थापन केल्या होत्या. यात भ्रष्टाचार नाही. काळ्या पैशाचाही मुद्दा नाही. आम्ही लोकहितासाठी या कंपन्या स्थापन केल्या. - बच्चू कडू, राज्यमंत्री, महाविकास आघाडी

  • एखाद्या मंत्र्याची खासगी कंपनी असणे यात गैर काहीच नाही. कंपनीचे व्यवहार कायद्यानुसारच चालतात. मंत्र्यांनी त्यांच्या पदाचा खासगी कंपन्यांच्या नफ्यासाठी वापर केला तर ते आक्षेपार्ह आहे. - डॉ अनिल बोंडे, माजी मंत्री भाजप

टॉप ५ कंपनीदार माजी मंत्री; उद्योग, बांधकाम क्षेत्रात सर्वाधिक कंपन्या

पंकजा मुंडे-पालवे
१४ कंपन्या (२ विद्यमान संचालक, १२ माजी संचालक/भागीदार)

जयकुमार रावल
१० कंपन्या (९ विद्यमान संचालक, १ माजी संचालक)

अतुल सावे
८ कंपन्या (७ कंपन्या स्वत:च्या नावाने, तर १ कुटुंबीयांची)

विनोद तावडे
६ कंपन्या (या सर्व कंपन्यांत माजी संचालक)

देवेंद्र फडणवीस
४ कंपन्या (२ सरकारी, २ खासगी, १ विद्यमान, ३ माजी संचालक)

बातम्या आणखी आहेत...