आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातारा:मुलांना आणण्यासाठी जात असलेल्या दाम्पत्यावर काळाचा घाला, कार अपघातात दोघेही जागीच ठार

साताराएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कोल्हापुरात असलेल्या मुलांना आणण्यासाठी पुण्याहून कोल्हापूरकडे जाताना झाला अपघात

कोल्हापुरात असलेल्या मुलांना आणण्यासाठी पुण्याहून कोल्हापूरकडे जात असताना कारचा भीषण अपघात होऊन पुण्यातील (हडपसर) दाम्पत्य जागीच ठार झाले. सातारा जिल्ह्यातील उब्रंज (ता. कराड) हद्दीत आज पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. अमित आप्पाजी गावडे (वय 38) आणि डॉ. अनुजा अमित गावडे (वय 35), अशी त्यांची नावे आहेत.  

लॉकडाऊनमुळे कोल्हापूरमध्ये अडकलेल्या मुलांना आणण्यासाठी गावडे दाम्पत्य वॅगनर कारने पुण्याहून कोल्हापूरला निघाले होते. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकून सातारा बाजूच्या लेनवर जाऊन पलटी झाली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या गावडे दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. कटावणीच्या साह्याने कारचे दार तोडून गाडीत अडकलेल्या चालकास बाहेर काढण्यात आले. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच हायवे हेल्पलाइनचे कर्मचारी दस्तगीर आगा, अमित पवार, सलिम देसाई, रमेश खुडे व उब्रंज पोलिस पोलिसांनी धाव घेवून मदतकार्य केले.        

बातम्या आणखी आहेत...