आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेक टीआरपी केस:अर्णब गोस्वामींच्या अटकेविरोधातील याचिका फेटाळली, 'जर ते आरोपी असतील, तर पोलिसांनी समन्स पाठवून चौकशीसाठी बोलवावे'- न्यायालय

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कथित टीआरपी घोटाळ्यातील एफआयआर रद्द करण्यास आणि अर्णब गोस्वामी यांच्या अटकेला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने पोलिसांना अर्णब यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलवण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने हेदेखील म्हटले की, समन्स मिळाल्यानंतर गोस्वामी यांना पोलिसांच्या चौकशीत सहकार्य करावे लागेल.

चौकशी अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश

कोर्टाने मुंबई पोलिसांना गेल्या आठवड्यात झालेल्या तपासणीचा प्रगती अहवाल सीलबंद लिफाफ्यात सादर करण्यास सांगितला आहे. कथित टीआरपी घोटाळ्यातील मुंबई पोलिसांच्या एफआयआरविरोधात रिपब्लिक मीडिया नेटवर्कने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने 5 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजता याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे सांगितले आहे.

मागच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली होती

मागच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टकडून कथित टीआरपी स्कॅममध्ये मुंबई पोलिसांची एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळून लावल्यानंतर रिपब्लिक मीडिया नेटवर्कने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावर आज जस्टिस एसएस शिंदे आणि एमएस कार्णिक यांची डबल बेंच सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल महाराष्ट्र सरकारकडून आणि हरीश साळवे रिपब्लिक मीडिया नेटवर्ककडून बाजू मांडत होते.

बातम्या आणखी आहेत...