आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेची तारीख जाहीर:दहावी आणि बारावी परीक्षेची तारीख ठरली, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितल्यानुसार, यंदा 12 वीची परीक्षा 23 एप्रिलपासून, तर 10वीची परीक्षा 29 एप्रिलपासून सुरू होणार आहे.

कोरोना संकटात गेल्या मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांसह पालकांना प्रश्न पडला होता. दरम्यान, दहावी-बारावी परीक्षेबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. 12वीची परीक्षा 23 एप्रिलपासून सुरू होईल तर 29 मे रोजी 12वीचा शेवटचा पेपर असेल, तर 10वीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये घेतली जाईल. तसेच, 12 वी परीक्षेचा निकाल निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होईलल. तर, दहावी परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...