आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी:300 किलोमीटरचे अंतर कापूनही तिची आईभेट राहिली अधुरीच, मजूर महिलेचा मानवतमध्ये मृत्यू; लॉकडाऊनमुळे परतत होती महिला

मानवत2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • अहमदनगरपासून 300 किमी अंतर कापले परंतु 40 किमी अंतर बाकी असताना तिला मृत्यूने गाठले

लॉकडाऊनमुळे हाताला कामधंदा न राहिलेल्या महिलेने आई व मामाचे गाव गाठण्यासाठी नगर जिल्ह्यातून मिळेल त्या वाहनाने 300 किलो मीटरचे अंतर कापले. परंतू अवघ्या 40 किलो मीटर अंतरावरच मानवतमध्ये तीचे हे आई भेटीचे स्वप्न अधुरेच राहीले. मंगळवारी (दि.05) सकाळी मानवत मधील के.के.एम. महाविद्यालयासमोर या महिलेचा अपघाती मृत्यू झाला. दरम्यान तीच्या या मृत्यू बाबत अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

सुनीता कैलास कतार असे या मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. नगर जिल्ह्यात मजूरीचे काम करणारी सुनीता एकटीच तेथे वास्तव्यास होती. तीची बहिण नांदगाव (जि. नाशिक) तालुक्यातील घाटपारा या गावी असल्याने लॉकडाऊनमध्ये हाताला काम न राहिल्याने ती बहिणीकडे काही दिवस राहण्यास गेली. परंतू लॉकडाऊन वाढतच असल्याने तीने नगरमार्गे दैठणा (ता.परभणी) या गावाकडे येण्याचा निर्धार केला. दैठणा येथे तीची आई व मामा वास्तव्यास असल्याने तीने माजलगाव, पाथरी मार्गे मिळेल त्या वाहनाने आपले मार्गक्रमण सुरु केले. मंगळवारीच ती नगरहून निघाली होती. त्यामुळे तीला एखादे वाहन मिळाले असावे, असा पोलीस सूत्रांचा अंदाज आहे. मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास सुनीताचा मृतदेहच मानवतमधील के.के.एम. महाविद्यालयाच्यासमोर असलेल्या उड्डानपूलाच्या बाजूस आढळून आला. एखाद्या अज्ञात वाहनाने तीला धडक दिली असावी, असा पोलीसांचा कयास आहे.

के.के.एम. महाविद्यालयाच्या सुरक्षारक्षकाला सकाळी 5 च्या सुमारास चहा आणतांना तीचा मृतदेह आढळून आला नव्हता. मात्र साडेपाचच्या सुमारास मॉर्निग वॉकला जाणार्‍या काही नागरीकांना तीचा मृतदेह आढळला. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात मधुकर उमाजी कच्छवे यांच्या फिर्यादीवरुन नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...