आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • The Decision Will Be Taken After Reviewing The Situation In The Next Few Days, Ajit Pawar's Response To The Lockdown

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुनश्च लॉकडाउन ?:पुढील काही दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, लॉकडाउनवर अजित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिवाळीनंतर कोरोना वेग वाढताना दिसत आहे

राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर कोरोना संसर्गाचा वेग वाढलेला पाहायला मिळत आहे. यामुळे आता आणखी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. दरम्यान, राज्य सरकार पुन्हा लॉकडाऊनचा होणार का ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे.

माध्यमांशी बातचीतदरम्यान अजित पवार म्हणाले की, 'दिवाळीदरम्यान अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली होती. यापूर्वी गणेश चतुर्थीलाही अशीच परिस्थिती होती. सध्या आम्ही संबंधित विभागाशी बोलत आहोत. पुढील 8-10 दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. नागरिक घाबरुन जाण्याचे कारण नाही. राज्य सरकारने एक नियमावली तयार केली आहे, या नियमांचे नागरिकांनी पालन करावे', असे पवार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...