आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नरभक्षक बिबट्या ठार:तीन जिल्ह्यातील 9 जणांना ठार करण्याऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभागाला यश

सोलापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • गेल्या महिनाभरात त्या बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला होता

सोलापूरसह नगर, बीड जिल्ह्यातील नऊ जणांना ठार व पाच व्यक्तीना गंभीर जखमी करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला शुक्रवारी (दि.18) बिबटरगावमध्ये शार्पशूटरने ठार मारले. गेल्या महिनाभरात त्या बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला होता.

चिखलठाण येथील उसाच्या फडात लपलेल्या त्या बिबट्याला पकडण्यासाठी उसाचा फड पेटवला. पण, त्यातून तो निसटला होता. मागील 15 दिवसांपासून त्यास गोळ्या घालण्यासाठी यंत्रणा फिरत होती. पण, चकवा देऊन बिबट्या प्रत्येक वेळेस निसटत होता.

दरम्यान, मागील आठ दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली मंदावल्या होत्या. यातच, तो करमाळा तालुक्यातून माढा तालुक्याकडे सरकल्याची शक्यता गृहीत धरून तपास सुरू होता. पण, शुक्रवारी बिबट्या पांडुरंग राखुडे यांच्या केळीच्या फडात तो असल्याचे कळताच वनविभाग व शार्पशूटरने त्यास घेरले आणि सव्वा सहा वाजता त्यास ठार केले.

बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडलेल्यांमध्ये पैठणच्या काका - पुतण्याचा आणि बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील दहा वर्षाचा मुलाचा समावेश आहे.

मृत्यू - अशेक आवटे, वय ५०, कृष्णा आवटे, वय ३० (दोघे रा. कोपेगाव,ता.पैठण, जि. औरंगाबाद), श्रीमती छबुताई एकनाथ लाठोड, वय ४४ (रा. भगवानगड तांडा, पाथर्डी), नागनाथ गिहनीनाथ गर्जे, वय-३६ ( सुरुडी, ता. आष्टा, जि. बीड), स्वराज सुनील भापकर, वय १० (रा. किन्ही, ता. आष्टी), सुरेखा नीलकंठ भोसले, वय ३३ (पारगाव, ता. आष्टी, बीड), कल्याण देविदास फुंदे, वय ४० (लिंबेवाडी, ता. करमाळा), जयश्री देवानंद शिंदे, वय २५ (अंजनडोह, ता. करमाळा), फुलाबाई कोटला (चिखलठाण, वय ९ वर्ष)

जखमी - एकनाथ राठोड, वय ४४ (भगवान गड तांडा, पाथर्डी), अल्का राजेंद्र बडे, वय ४० (जाटवाद, ता. शिरूर, बीड), शिलावती बाबा दिंडे वय-३३, अrभषेक बाबा दिंडे , वय-१५ (मंगरूळ, ता. आष्टी), शाळाबाई शहाजी भोसले, वय ६० ( पारगाव, ता. आष्टी)

त्या नरभक्षक बिबट्याला बेशुद्ध करून पकडा तो प्रयत्न फसल्यास गोळ्या घालून ठार मारण्याचा आदेश रविवारी (दि.६) प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी दिला होता. यानुसार, बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने 40 ट्रॅप कॅमेरे लावले होते. तसेच, तीन बेशुद्ध करण्यासाठी पथके, दोन शार्प शूटर, 5 हत्यारांसह पोलिस, नाशिक येथील दोन डॉग स्कॉड आहेत आणि थर्मल सेन्सर इमेज ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला.

यासोबतच, पुणे, जुन्नर, सोलापूर व नगर येथील वनविभाचे 100 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी या मोहिमेत सहभागी आहेत. 17 पथकाच्या माध्यमातून त्याची शोध मोहिम सुरू होती. काटगाव ( तुळजापूर) येथील कोळी समाजाचे 25 लोक त्यांच्याकडील 17 कुत्री घेऊन बिबट्या पकडण्यासाठी मोहिमेवर होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser