आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • The Government Will Not Fall Even If The Opposition Parties Break Their Fingers Every Day, Criticizes Congress Leader Prithviraj Chavan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण:विरोधी पक्षांनी रोज उठून बोटं मोडली तरी सरकार पडणार नाही, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • न्यायालयाने अर्णब-कंगना खटल्यात दिलेल्या निवाड्याबाबत आम्ही काही बोलणार नाही

पाच वर्षांच्या त्यांच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली होती म्हणून आम्ही हे सरकार स्थापन केले आहे. चांगले काम करणारे हे भक्कम सरकार आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी रोज उठून बोटं मोडली म्हणून हे सरकार बदलत नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकांना शनिवारी उत्तर दिले.

पुणे पदवीधरचे महाविकास आघाडीचे उमदेवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या निवडणुक प्रचारासाठी पृथ्वीराज चव्हाण वाई येथे आले होते.या वेळी आमदार मकरंद पाटील,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे,डी. एम. बावळेकर, बाबुराव शिंदे,विराज शिंदे आदी उपस्थित होते.

अर्णब गोस्वामी, कंगना राणावत यांच्या खटल्याबाबत न्यायालयाने सरकारला कोणताही दोष दिलेला नाही. या निकालाचा अभ्यास सुरू आहे, जर काही ही चुकीचे वाटले तर त्याबाबत अपील करता येईल. न्यायालयाने या खटल्यात दिलेल्या निवाड्याबाबत आम्ही काही बोलणार नाही. मात्र, अत्यंत महत्त्वाची प्रकरणे सुनावणीला येणे गरजेचे असताना व ३५ हजार पेक्षा जास्त महत्वाचे खटले सुनावणीसाठी प्रलंबित असताना न्यायालयाने राजकीय दृष्ट्या सोयीचे खटले सुनावणीला घेतले. त्याला आमची हरकत आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती नाही. या सरकारने वर्षभरात चांगले काम केले आहे. कोविडवर नियंत्रण चांगल्याप्रकारे आणले आहे. हे संकट असताना अनेक निर्णय, शेतकरी कर्ज, अवकाळी पाऊस, आदी अनेक विषय थांबलेले नाहीत.

चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीमध्ये केवळ करमणूक :

विरोधक केवळ द्वेषातून आणि विद्वेगातून आरोप करत आहेत आणि हे आरोप कोणीही गांभीर्याने घेत नाही. महाविकास आघाडीचे सरकार हे भक्कम व चांगले चालणारे सरकार आहे आणि हे पाच वर्षे पूर्ण करेल. चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये चाललेली जुगलबंदी एक करमणूक आहे यापेक्षा त्याला महत्व नाही, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.

देशात लाेकशाहीच नाही

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक महत्त्वाचे खटले प्रलंबित आहेत. पण हे खटले पुढे सुनावणी घेण्यासाठी न्यायालयाकडे वेळच नाही. याचा अर्थ सध्या देशात लोकशाही अस्तित्वातच नाही. लोकशाहीच्या सर्व संस्था केंद्र सरकारने व नरेंद्र मोदी यांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. त्यांच्या दबावाखाली काही काम होत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे लोकांना घटनेत अभिप्रेत असणारा न्याय मिळणार की नाही अशी शंका लोकांमध्ये निर्माण होत आहे .

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser