आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर कोश्यारी निरुत्तर:राज्यपाल म्हणाले, राजभवनावर येत जा; ठाकरे म्हणाले, मी येतो अन् अजितदादांनाही आणतो

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेना-भाजप जवळिकीच्या वावड्यांना मिळाला पूर्णविराम

शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेससोबत सत्तेत खुश नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वैतागून जुना दोस्त भाजपबरोबर पुन्हा येतील, अशा वावड्या राज्याच्या राजकारणात अनेक महिने उठत आहेत. मात्र, त्याला पूर्णविराम देणारा किस्सा नुकताच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निवासस्थानी म्हणजेच राजभवनावर घडला. उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल यांना आपल्या उत्तरातून तसे संकेत दिले आहेत.

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते मागच्या आठवड्यात राजभवनात गेले. आरक्षणासंदर्भात राष्ट्रपती यांना लिहिलेले पत्र राज्यपाल यांच्याकडे सोपवायचे होते. या शिष्टमंडळाचे नेतृत्व खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत होते. निवेदन देण्याचे, छायाचित्रे घेण्याचे औपचारिक सोपस्कार पार पडले. त्यानंतर चहापानास प्रारंभ झाला. बोलता बोलता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, उद्धवजी, हल्ली तुम्ही वर्षा बंगल्यावर मुक्कामाला असता. राजभवन अन् वर्षा शेजारी-शेजारीच तर आहे. वॉकिंगसाठी रोज राजभवनात येत चला, त्यावर लागलीच मुख्यमंत्री उद्धव म्हणाले, हो येईन की, सोबत अजित पवार यांना बरोबर घेऊन येईन. उद्धव यांच्या मिश्किल उत्तराने शिष्टमंडळातील उपस्थितांमध्ये एकच हशा उडाला. शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, नाना पटोले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आदी मंत्री होते. उद्धव यांच्या उत्तरावर राज्यपाल काहीच बोलले नाहीत.

बारा सदस्यांना अजूनही मंजुरी नाही

राज्य सरकारने विधान परिषदेसाठी शिफारस केलेल्या १२ सदस्यांच्या नियुक्त्या राज्यपाल यांनी एक वर्षानंतरही मंजूर केलेल्या नाहीत. त्यावरून देखील राज्यपाल आणि सरकारमध्ये वाद आहे.

भाजपचा सत्तेसाठी अाटोकाट प्रयत्न
राज्यात सत्ता स्थापनेचा भाजप दीड वर्षानंतरही दावा करते आहे. आमदार फोडून, विधानसभा बरखास्त करून किंवा एखादा पक्ष बाजूला वळवून सत्ता स्थापनेचे भाजपचे मनसुबे अनेकदा उघड झालेले आहेत. त्यातूनच शिवसेना पुन्हा भाजपकडे येईल, अशा बातम्या पुढे येत असतात. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिलेले उत्तर पूर्णविराम समजला जातो. शिवसेना आणि भाजपची आगामी निवडणुकीत युती अशक्य असल्याचे सध्या तरी दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...