आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाउनचे उल्लंघन:सोशल डिस्टन्स न ठेवता बैठक घेतली, माजी आमदार साळुंखेंसह 26 जणांवर गुन्हा दाखल

सांगोला3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जलपूजनाचा माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

माजी आमदार दीपक साळुंखे यांनी टेंभू योजनेचे पाणी जवळा परिसरात सोडण्यात आल्यानंतर त्याच्या नियोजनासाठी बंदी असतानाही सोशल डिस्टन्स न ठेवता बैठक घेवुन शासकीय आदेश भंग केल्याप्रकरणी त्यांच्यासह जवळा बुरंगेवाडी व सोनंद येथील शेतकऱ्यांविरोधात सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टेंभू योजनेतून शेतीसाठी पाण्याचे उन्हाळी आवर्तन चाचणीसाठी जवळा व परिसरात पाणी सोडण्यात येणार आहे, त्याच्या नियोजनासाठी 8 एप्रिल 2020 रोजी सोनंद, ता. सांगोला येथील मठात व बुरगेवाडी येथील सुभाष बावधने यांच्या शेतातील पत्राशेडमध्ये व पांडुरंग नारायण साळुंखे रा. जवळा यांच्या लिंबू मळ्यात ही बैठक आयोजित केली होती.

माजी आमदार सांळुखे यांच्यासह सतीश काशीद, महादेव पाटील, प्रकाश काशीद, साहेबराव काशिद, दीपक काशिद, राजाराम काशीद, तानाजी काशीद, संभाजी काशीद सर्व रा. सोनंद, सुभाष बावधाने, श्रीमंत बुरंगे, संतोष शेटे, गणेश माने, सुभाष बुरुंगे, नितीन बुरुगे, मोहन बुरुंगे सर्व रा. बुरूंगेवाडी, विजयकुमार देशमुख, पांडुरंग साळुंखे, वसंत साळुंखे, चंद्रकांत देशमुख, प्रशांत साळुंखे, विश्वास साळुंके, सज्जन गायकवाड, अंकुश कोळी, बाळासाहेब कोळी, सुनील साळुंखे सर्व रा. जवळा या शेतकऱ्यांवर पोलिस नाइक संजय चंदनशिवे यांच्या फिर्यादिवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जलपूजनाचा माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

सागोला - टेंभू योजनेच्या पाण्याचे गुरव व कोळीवस्ती जवळा येथे पूजन करून शासकीय आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी उपसरपंच अप्पासाहेब देशमुख यांच्यासह चार जणांविरोधात सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. ८ एप्रिल रोजी टेंभू योजनेचे पाणी जवळा भागातील गुरव व कोळी वस्ती येथे पोहोचल्यावर शासकीय आदेशाचा भंग करून जलपूजन केले म्हणून माजी उपसरपंच अप्पासाहेब देशमुख, संजय साळुंखे, वैभव देशमुख, नवनाथ बुरंगे, प्रशांत साळुंखे सर्व रा.जवळा यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिस नाइर्क चंदन संजय चंदनशिवे यांनी फिर्याद दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...