आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नैऋत्य मोसमी वारे कर्नाटकातल्या कारवारमध्ये रेंगाळले आहेत. अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा सुस्तावली आहे, तर बंगालच्या उपसागरातील शाखेने आता तामिळनाडू ओलांडत आसामच्या काही भागात प्रवेश केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास अनुकूल स्थिती आहे. दरम्यान, या आठवड्यात राज्यात जोरदार पूर्वमोसमी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
निसर्ग चक्रीवादळाने अरबी समुद्रातील मान्सूनच्या शाखेने प्रगती करत कर्नाटकातल्या कारवारपर्यंत मजल मारली. मात्र ४ जूनपासून मान्सून तेथेच अडकला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे त्या शाखेने तामिळनाडू ओलांडत आसामच्या काही भागापर्यंत प्रगती केली आहे.
आठवडाभर राज्यात बरसणार पूर्वमोसमी सरी
पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार राज्यात ११ ते १४ जून या काळात जोरदार पूर्वमोसमी पाऊस होईल.
> ११ जून : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस
>१२ जून : राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता
> १३ जून : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता
> १४ जून : मध्य महाराष्ट्रात मुसळधार तर मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.