आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • 'The Number Of Patients In The State Is Increasing, MNS Should Cooperate', Uddhav Thackeray's Call To Raj Thackeray

मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन:'राज्यातील रुग्णांची संख्या वाढत आहे, लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागेल, मनसेने सहकार्य करावे'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण एकट्या महाराष्ट्रात समोर येत असल्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. यापूर्वी, उद्धव ठाकरे यांनी बंधू आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला आहे.

'राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे, राज्य सरकार आज लॉकडाऊनचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे.

'राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो,त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजसाहेबांना फोनवरील संवादात केले', असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अकाऊंटवरुन सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...