आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नांदेड:माहूरमधील पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण सर्वोत्तम 11 पीपीएम

नागपूर4 महिन्यांपूर्वीलेखक: अतुल पेठकर
  • कॉपी लिंक

“गोदावरी नदी संसद’ फेसबुक ग्रुपमार्फत नांदेड जिल्ह्यातील जलप्रदूषण तपासणी केमिकल किटद्वारे करण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत माहूर येथील मातृतीर्थ, भानुतीर्थ, काशीकुंड, ऋणमोचन कुंड जलाशयातील विरघळलेल्या प्राणवायूची तपासणी केली असता ती ११ पीपीएम इतकी सर्वोत्तम आढळून आली. इतकी उत्तम पातळी केवळ हिमालयीन नद्या, गंगा नदीच्या उगम क्षेत्रात आढळते, अशी माहिती ग्रुपचे संयोजक दीपक मोरताळे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

पुरातन ग्रंथांमध्ये मातृतीर्थ कुंडाची निर्मिती श्री रेणुकादेवी पूत्र श्री परशुराम भगवान यांनी केल्याचे उल्लेख आहे. तसेच हे कुंड म्हणजे गंगेचे तीर्थ समजल्या जाते. या प्रयोगामुळे मातृतीर्थ येथील जल हे अतिउच्च दर्जाचे आहे हे सिद्ध होते. तसेच भानुतीर्थ कुंडातील पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण १०.५ पीपीएम तर काशीकुंडातील पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण ८.५ पीपीएम आढळून आले आहे. तसेच ऋण मोचन कुंडात हेच प्रमाण १० पीपीएम इतके आहे. २०१९ मध्ये श्री रेणुका देवी संस्थान, सूर्योदय फाउंडेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, माहूर महाश्रमदान ग्रुप, जलस्वराज्य परिवार यांच्या सहकार्याने या कुंडातील शेकडो वर्षे साचलेला गाळ लोकसहभागातून काढण्यात आला होता. हा गाळ काढण्यात आल्यामुळे या सर्व कुंडास नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. २०२० मध्ये श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने मातृतीर्थ परिसरात मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण, वृक्षारोपण करण्यात आले. श्री रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष विश्वस्त, चंद्रकांत भोपी, संजय कन्हव यांच्या मार्गदर्शनाखाली कामे पूर्ण करण्यात येत आहेत . मातृतीर्थ परिसर अत्यंत विलोभनीय दिसत आहे.

भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे मातृतीर्थक्षेत्राचे दर्शन भक्तगणांना सूर्योदय व सुर्यास्ताला होत आहे. निलेश केदार गुरुजी व माहूर महाश्रमदान ग्रुप यांचे सहकार्य यासाठी लाभत आहे. भविष्यात पाणीप्रदूषण न होण्यासाठी गोदावरी नदी संसद मार्फत वैज्ञानिक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी सर्वसमावेशक “गोदावरी नदी संसद’ फेसबुक ग्रुप स्थापन करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...