आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट:महाआघाडी सरकारला देवेंद्रांचा ‘पेन’ ड्राइव्ह! महाजनांसह मला अडकवण्यासाठी आघाडी सरकारचा कट : फडणवीस

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काहीही झाले तरी फडणवीस-गिरीश महाजन यांना अडकवायचे तसेच गिरीश महाजन यांना मोक्का लावण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करायचा कट आघाडी सरकारने रचला असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. या कथित कारस्थानाचा पेनड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला असून यात तब्बल सव्वाशे तासांचे संभाषण आहे. फडणवीस यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. फडणवीस यांनी शरद पवार यांचे नाव न घेता राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांवरही या कटात सामील असल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवल्याचे ते म्हणाले. तसेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी लागेबांधे असल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करून संजय राठाेड, अनिल देशमुख यांचे मंत्रिपदाचे राजीनामे घेतले गेले, मग मलिक यांचा राजीनामा का घेत नाही, असा सवाल त्यांनी केला.

विधानसभेत मंगळवारी राज्यातील कायदा-सुव्यवस्था विषयावरील सूचना मांडली गेली हाेती. त्यावरीच चर्चेला सायंकाळी सुरुवात झाली. प्रारंभी फडणवीस यांनी राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर बाेट ठेवत काही घटना सांगितल्या. त्यानंतर मात्र त्यांनी आक्रमक हाेत.

राज्यातील विराेध पक्षातील नेत्यांना खाेट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी सरकारच कट रचत असल्याचा थेट आराेप केला. मला आणि महाजन व विराेधकांना संपवण्याचा हा कट आहे. असे हाेत राहिले तर राज्य घटनेवर काेणीही विश्वास ठेवणार नाही असे सांगत कट रचण्याच्या संदर्भातील काही संभाषण असलेला पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सुपुर्द केला.

महाजन यांच्यावर पुण्यात २०२० मध्ये गुन्हा दाखल झाला. सन २०१८ ची ती घटना हाेती, त्यात महाजन तेथे नव्हतेच. जळगावच्या मराठा शिक्षण मंडळात वाद झाल्याची आणि त्यानंतर तेथे महाजन यांचा सहभाग असल्याचा बनावट खटला लिहिला गेला. त्यासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांनी विशेष कामगिरी केली. याच वकीलाकडे राज्यातील महत्वाच्या खटल्यांची जबाबदारी दिली गेली. त्यांचे कार्यालय हे विराेधकांविरूध्द कट रचण्याचे ठिकाण हाेते. महाजन यांना अडकविण्यासाठी चाकू आणून, त्याला रक्त लावण्याचा कट रचला गेला. घटनेचा एफआयआर,जबाब लिहिण्याचेही काम चव्हाण यांनीच केले. हे करण्यासाठी त्यांना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सर्व व्यवस्था लावून दिली हाेती. या कटात सहभागी असलेल्या नेत्यांच उल्लेख असलेले व्हिडीओ सव्वाशे तासाचे उपलब्ध आहेत, असे सांगतानाच या व्हिडीओमध्ये ‘साहेब’ यशवंतराव चव्हाण सभागृहात आहेत, त्यांनी फाेन केला,. अशी माहिती देत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे निर्देश केला. दिलीप वळसे पाटील, अजित पवार सगळे नेते तिथे हाेते. एसीबी सुषमा चव्हाण रेडमध्ये सहभागी हाेणाऱ्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. अशा प्रकारचे व्हीडीओ, संभाषण रेकाॅर्डींग आपल्याकडे आहे, असे सांगत फडणवीस यांनी ते पेनड्राईव्ह सभागृहाला दाखविले. महाजन, फडणवीस यांना अडकवायचे आहेच कथित संभाषणामध्ये सरकारी वकील चव्हाण म्हणतात, काहीही झाले तरी फडणवीस, महाजन यांना अडकायचे आहे. ‘साहेबांना’ त्यांना अडकावयाचे आहे पण अनिल देशमुख गेल्याने अडचण झाली, वळसे पाटील काहीच करत नाहीत, पाटणकर वकील जजला मॅनेज करतात. रावळ आणि महाजन यांना उचलले की भाजप हादरला असता असे मी साहेबांना सांगितले, असे संभाषण असल्याचे फडणवीस म्हणाले. साेलापुरात गुन्हा नाेंदवून मला अडकवायचा डाव मुख्यमंत्री रिलीफ फंडाची फाईल घेत साेलापूर ग्रामीण मध्ये गुन्हा नाेंदवायचा, ओमप्रकाश शेटे यांना त्यात अटक करायची त्यात मला गोवायचे आणि मंगेश चव्हाणची फाईल घेवून गुन्हा नाेंदवायचा म्हणजे महाजनही अडकतात असा कट रचला गेला. दहा काेटी रुपयाची देणगी मिळाल्या प्रकरणी ती तक्रार दाखल झाली आहे,असा आरोप फडणवीस यांनी केला.

नाना पटाेले यांचा पलटवार
फडणवीस यांचे भाषण संपल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी चर्चेत भाग घेताना गुन्हेगारी प्रवृत्ती भाजप सरकार असतानाच सुरू केल्याचा आराेप केला. इक्बाल मिर्चीचे पैसै घेऊन पक्ष चालवणाऱ्यांची चाैकशी केली जावी, मागील सरकारने जी गुन्हेगारी प्रवृत्ती आणली त्याचा बीमाेड सरकारने केला पाहिजे, असे पटोले म्हणाले.

संभाषणात राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा उल्लेख
फडणवीस यांनी केलेल्या आराेपात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि ‘साहेब’ असा उल्लेख केलाच; पण उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचाच उल्लेख केला आहे.

बातम्या आणखी आहेत...