आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दहावीचा निकाल:उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल, दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. हा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. SSC Result 2020 या संकेत स्थळावर निकाल पाहता येणार आहे.

मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, लातूर, नाशिक, कोल्हापूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या अधिकृत संकेतस्थळावर उद्या बुधवार 29 जुलै रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबतच सर्व माहिती उपलब्ध असणार आहे.

या तीन वेबसाइटवर पाहता येणार निकाल

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeduction.com

दहावीची परीक्षा ही 3 मार्च 2020 ते 23 मार्च 2020 दरम्यान घेण्यात आली. याच काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. यामुळे सरकारने दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. 2020 मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यी बसले होते. यामध्ये 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी, तर 7 लाख 89 हजार 898 विद्यार्थिनी परिक्षेत बसल्या होत्या.