आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • The Sale Of Counterfeit Corona Treatment Pills In The District Used Starch Instead Of Drugs In Osmanabad; News And Live Upadates

उस्मानाबादमधील धक्कादायक प्रकार:जिल्ह्यात कोरोना उपचाराच्या बनावट गोळ्यांची विक्री औषधांऐवजी स्टार्चचा केला वापर

उस्मानाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संबंधित वितरकांनीच संगनमत केल्याचा संशय, औषध निरीक्षकांकडून तपासणी
  • मुंबईत जप्तीची मुख्य कारवाई, जिल्ह्यातीलही स्टॉक परत मागवला

कोरोना आजारावर उपचार करण्यासाठी हमखास वापरण्यात येणाऱ्या फेव्हीमॅक्स गोळ्या बनावट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामध्ये आवश्यक औषधी विक्री करण्याऐवजी चक्क कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टार्चचा उपयोग केला असल्याचेही उघड झाले आहे. याप्रकरणी मुंबईत मुख्य कारवाई करण्यात आली असून उस्मानाबाद जिल्ह्यातून अशा गोळ्यांचा स्टॉक परत मागवण्यात आला आहे. उस्मानाबादसह उमरगा येथील मेडिकलमधून अशा गोळ्यांची विक्री झाली आहे.

सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढला आहे. अशात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचाही आकडा अधिक आहे. यामुळे रुग्ण कोणत्याही परिस्थितीत योग्य उपचार मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच फायदा घेत सर्वत्रच बनावट औषधांचा बाजार फोफावला आहे. काही दिवसांपूर्वी विविध ठिकाणी बनावट रेमडेसिव्हिर इंजेक्शन विकण्याचा प्रकार उघडकीस आला. आता कोरोना आजारवर हमखास वापरण्यात येणाऱ्या गोळ्याही बनावट असल्याचे समोर आले आहे.

कोरोना आजारावर उपचार करण्यासाठी फेविमॅक्स नावाच्या गोळ्या रुग्णांना दिल्या जातात. या गोळ्या बनावट असल्याची माहिती गुप्त खबऱ्यांकडून मिळाली. यामुळे अन्न व औषध प्रशासनाने तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई येथे यासंदर्भात मुख्य कारवाई करण्यात आली आहे.

कळंब: एक लाख ७७ हजारांच्या अप्रमाणित गोळ्या जप्त
कळंब | ताप, डोकदुखी आदी आजारांसाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या अप्रमाणित असल्याचे सिद्ध झाल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने अशा गोळ्यांचा एक लाख ७७ हजार ९५० रुपयांचा स्टॉक जप्त केला आहे. मागील काही दिवसापुर्वी कळंब येथील डिकेजी एलपी संजीवनी फार्मासिटिकल या दुकानात एसीक्लोफेनेक पॅरासिटामोल अँड सेरेंटोइपेप्टिडेस टॅब्लेट या गोळ्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. यामध्ये काही घटक कमी असल्याचे निदर्शनास आल्यामुळे या गोळ्या अप्रमाणित असल्याचे समोर आले होते. प्रशासनाची कारवाई अमान्य करत कंपनीने केलेल्या अपिलानुसार कळंब न्यायालयामार्फत नमुणे फेरतपासणीसाठी कोलकाता येथील केंद्रीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

प्रयोग शाळेचा अहवाल प्राप्त झाला असुन औषधातील मात्रा शासनाच्या मानका प्रमाणे नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी या औषधाची विक्री वापर व तात्काळ बंद करण्यात आला होता. कंपनीने विक्रीसाठी दुकानदारांना दिलेल्या १ लाख ७७ हजार ९५० रुपयांच्या २३४६ स्ट्रीप्स जप्त करण्यात आली. ही कारवाई औषध निरीक्षक विलास दुसाने यांनी केली. गोळ्या लाइफ विजन हेल्थकेअर (हिमाचल प्रदेश) या कंपनीने तयार केली आहेत.

औषधातील मात्रा शासनाच्या मानका प्रमाणे नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. १८ जूनला औषध निरीक्षकांनी दुकानात तपासणी केली. या तपासणीत त्यांनी नमुने तपासले. सुरुवातीला औरंगाबाद येथील अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेकडे नमुने पाठविले होते.

तपासणी वाढवण्याची आवश्यकता
दरम्यान, कोरोना संसर्गाच्या कालावधीतच बनावट गोळ्यांचा प्रकार उघडकीस आला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातच आवश्यक घटक कमी प्रमाणात वापरला असल्याच्या औषधी आढळून आल्या असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे विलास दुसाने हेच एकमेव संपूर्ण जिल्ह्यासाठी औषध निरीक्षक आहेत.

कपडे धुण्याचे स्टार्च
संबंधित गोळ्यांमध्ये कोरोना आजारवर परिणामकारक असलेला फेरीपिराव्हीर हा घटक असणे आवश्यक असते. मात्र, या गोळ्यांमध्ये या घटकाचा थोडाही लवलेश आढळून आला नाही. याच्याजागी कपडे धुण्याचे स्टार्च वापरण्यात आले आहे. अशा पद्धतीचे स्टार्च गोळ्यांमध्ये घट्टपणासाठीही वापरण्यात येत असते.

विविध घटक कमी टक्केवारीत
गोळ्यांच्या तपासणीमध्ये अनेक त्रुटी आढळल्या असून अलफिनक हे घटक ७८.१४ टक्के, पॅरासिटोमॉल ९२.७५ टक्के, सेराटीओपेपटीडाईस ५९.७१ टक्के इतक्या कमी प्रमाणात नमूद टक्केवारीपेक्षा निदर्शनास आले. डायक्लोफिनॅक सोडियम टॅबलेट वरील स्ट्रीप वरती मात्रा दिलेली नसताना सुद्धा डायक्लोफिनॅक सोडियम आढळुन आले आहे.

विक्री नसल्यास परत
फेविमॅक्स नावाच्या गोळ्या कोराेना उपचारात वापरण्यात येतात. या गोळ्या बनावट असल्याचे समोर आल्यानंतर जिल्ह्यातही याचा काही स्टाॅक असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित दुकानदारांना स्टॉक विक्रीवर प्रतिबंध करण्यास सांगण्यात आले आहे. विलास दुसाने, औषध निरीक्षक

कंपनीच नाही अस्तित्वात
गोळ्यांच्या पाकिटांवर या गोळ्यांचा उत्पादक हिमाचल प्रदेशातील सोलन येथील मे. मॅक्स रिलिफ हेल्थकेअर ही कंपनी असल्याचे नमुद आहे. याअनुषंगाने हिमाचल प्रदेशात संपर्क साधण्यात आला होता. मात्र, दिलेल्या पत्त्यावर ही कंपनीच अस्तित्वात नसल्याचे समोर आले आहे. यामुळे संबंधित वितरकांनीच संगनमत केले असावे.

  • उस्मानाबाद, उमरगा तालुक्यात झाली गोळ्यांची विक्री
  • हिमाचल प्रदेशात उत्पादक कंपनीच नाही अस्तित्वात
बातम्या आणखी आहेत...