आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावातील घटना:मुख्याध्यापकाच्या खुर्चीमध्ये बसण्यावरून शाळेच्या अध्यक्षाने शिक्षकाचे दात पाडले; परस्परविरोधी तक्रारी

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिलेचा शिक्षकावर विनयभंगाचा आरोप

मुख्याध्यापकाच्या खुर्चीत बसण्याच्या वादातून शाळेच्या अध्यक्षाने शिक्षकास बेदम मारहाण केली. या मारहाणीत शिक्षक बिलाल अहमद अब्दुल अन्सारी यांचे दात पडले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार शनिवारी (दि. २६ जून) रोजी शहरातील सकाळी हजार खाेली भागातील शेख उस्मान हायस्कूलमध्ये घडला.

याप्रकरणी आयशानगर पाेलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. माेमीनपुरा भागात रहाणारे बिलाल अन्सारी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शाळेचे अध्यक्ष अखलाख अहमद माेहंमद अय्यूब यांनी अन्सारी यांना मुख्यध्यापकाच्या खुर्चीवर बसायचे नाही असे सांगून वाद घातला. यातून अन्सारी यांना मारहाण करून दमदाटी केली. यात त्यांचे दात पडले.

महिलेचा शिक्षकावर विनयभंगाचा आरोप
शाबिना अखलाख अहमद व इकरानाज अखलाख अहमद यांनीही चापटीने मारहाण करून छेडछाडीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. मारहाणीत जखमी झाल्याने अन्सारी यांच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शाबिना यांनी अन्सारी यांच्यावर विनयभंगाचा आराेप केला आहे. दाखल गुन्ह्याचा तपास सहायक पाेलिस निरीक्षक पवार व उपनिरीक्षक के. जी. व्यवहारे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...