आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरमून:नवीन वर्षातील दुसरा सुपरमून दिसणार आज, नेहमीच्या चंद्रापेक्षा 30 टक्के अधिक तेजस्वी

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चंद्रग्रहणाचे ओझरते दर्शन

मागील महिन्यात २७ एप्रिल रोजी, या वर्षीचा पहिला “सुपरमून’आपल्या भेटीला येऊन गेला. आता बुधवार, दि. २६ मे रोजी दुसरा सुपरमून बघायला मिळणार आहे. चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असतो. त्यामुळे तो महिन्यातून एकदा पृथ्वीच्या जवळ येतो व एकदा दूरही जातो. मात्र ज्यावेळी चंद्र पृथ्वीपासून कमी अंतरावर येतो, त्यावेळेस चंद्राचे बिंब नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा मोठे दिसते. अशा चंद्राला ‘सुपरमून’ असे म्हणतात. साधारणत १२ महिन्यांच्या कालचक्रात चार ते सहा सुपर मूनचे योग येतात. २६ मे रोजी चंद्र, पृथ्वीपासून किमान अंतरावर येईल, त्या वेळी हे अंतर ३,५७,३११ किलो मीटर राहील. तो नेहमीच्या चंद्रापेक्षा ३० टक्के अधिक तेजस्वी व आकारमानात १४ टक्के मोठा दिसेल.

सुपरमून या शब्दाची व्याख्या खगोलातली नाही. हा शब्द ‘रिचर्ड नोले’ यांनी १९७९ मध्ये प्रचारात आणला. सुपरमूनप्रमाणेच आता वर्षातील प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या चंद्राला वेगवेगळी नावे देण्याचा प्रघात आहे. या सुपरमूनचे अवलोकन करावे, असे आवाहन स्काय वॉच ग्रुपचे रवींद्र खराबे, राम जयस्वाल, प्रमोद जिरापुरे, प्रशांत भगत, देवेद्र पांडे, उमेश शेंबाडे, भूषण ब्राम्हणे, जयंत कर्णिक, पंकज गोपतवार, पूजा रेकलवार व मानसी फेंडर यांनी केले आहे.

चंद्रग्रहणाचे ओझरते दर्शन
याच दिवशी ईशान्य भारतातून पुरी, भुवनेश्वर, कटक, बालासोर, कोलकाता, आसाम, मिझोराम, मेघालय, नागालँड, अरुणाचल प्रदेश, व मणिपूर येथे सायंकाळी ३५ मिनिटांसाठी खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. या ग्रहणास दुपारी ३.१५ वाजता सुरुवात होणार असल्याने आपल्याकडे चंद्रोदय झाल्यानंतर थोडा वेळ खंडग्रासित चंद्र दिसेल व लगेच ६.२३ वाजता ग्रहण संपेल. त्यानंतर ७.१९ वाजेपर्यंत भारतात छायाकल्प चंद्रग्रहण असेल.

बातम्या आणखी आहेत...