आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण:राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे; चंद्रकांत पाटलांचे सरकारवर टीकास्त्र

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण याचिकेवरील सुनावणी 4 आठवड्यासाठी पुढे ढकलली आहे. यामुळे मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून विरोधकांनीही सरकारला धारेवर धरले आहे. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील मराठा आरक्षणावरील सुनावणी लांबणीवर पडण्यासाठी सरकार कारणीभूत असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांना फटकारले.

कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'आता उद्धव ठाकरे किंवा अशोक चव्हाण यांचा राजीनामा घेऊन काही साध्य होणार नाही. याप्रकरणी राजकारण करायचे नाही. परंतू, आजच्या सुनावणीवेळी घडलेल्या प्रकारावरून राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे,' असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला.

'मराठा आरक्षणाला 9 सप्टेंबरला स्टे मिळाला होता. या नंतर 47 दिवसात सरकारकडून आरक्षणासाठी झालेले प्रयत्न हे संशयास्पद आहे. स्थगिती देणाऱ्या खंडपीठासमोर आजची सुनावणी करणे शक्य नाही हे आज तुम्हाला सुचलं का? पाच न्यायायाधीशांकडे जाणारी केस पूर्ण मेरिटवर ऐकली जाईल. फक्त स्थगिती उठवण्याबाबत सुनावणी होणार नाही,' असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.