आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:मराठा आरक्षणावर राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी, उदयनराजे भोसले यांची साताऱ्यात टोलेबाजी

साताराएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा आरक्षणावर राज्य शासनात असलेल्या आमदारांनी मराठा आरक्षणावर काय केले याची उत्तरे द्यावी, आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी , तुम्ही काय केले ? हे एकदा लोकांना कळू द्या अशी घणाघाती टीका उदयनराजे भोसले यांनी केली. साताऱ्यातील जलमंदिर पॅलेसमध्ये उदयनराजे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला आणि मराठा आरक्षणावर आपली चौफेर फटकेबाजी सुरूच ठेवली.

ते पुढे म्हणाले, "आरक्षण ठेवायचं असेल तर ठेवाना आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये. तेथे कोण जाते, एक तर मराठा, रजपूत, सीख बॉर्डरवर असतात. आज हे सगळे म्हणाले राहूद्या आपल्या कुटुबांवर अन्याय होत आहे आणि बॉर्डर सोडली तर काय होईल. सगळ्या गोष्टी पैशावर अंवलबून नसतात. जशी बेकारी वाढणार तशा या गोष्टी होणार. आता मराठा आरक्षणावर केवळ रक्तपात होण्याची शक्यता आहे असे स्फोटक वक्तव्य उदयनराजे यांनी केले .

उदयनराजे भोसले म्हणाले, मी विष पिणार असे म्हटले नाही तर त्यापलीकडची परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठा कुटुंबात मी जन्मलो म्हणून नाही तर वाटत प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, मराठा आरक्षणाच्या मागण्या रास्त आहेत. मग मराठ्यांना न्याय का नाही. राज्य सरकारने मराठा आरक्षणाची जवाबदारी केंद्र सरकारवर ढकलू नये, आत्तापर्यंत राज्य शासनाने मराठा आरक्षणावर काय मांडणी केली यांची माहिती सर्वांना होऊ दे त्यासाठी त्यांनी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी उदयनराजे यांनी केली .आम्ही सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला त्यासाठी बैठक घेतली पण ते आले नाहीत . त्यामुळे ज्या लोकांनी मतदान केले ते त्यांना जागा दाखवतील . मराठा आरक्षणावर कोणी नेतृत्व करायचे म्हणले की उदयनराजे यांचे नाव समोर येते , तुम्हाला वाटते का यातून आरक्षण प्रश्नावर मार्ग निघेल असा प्रतिप्रश्न उदयनराजे यांनी करताना रक्तपात हा एकच मार्ग असल्याचा खळबळजनक दावा केला.

बातम्या आणखी आहेत...