आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाल पाण्याची सत्यता:लोणार सरोवरातील पाणी लाल नसून गावातील सांडपाण्याने झाले गढूळ

लोणार9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरोवराचे पाणी गुलाबी झाल्याची चर्चा

जागतिक कीर्तीचे लोणार सरोवराचे पाणी गुलाबी झाले, अशी चर्चा जोर धरत आहे. मात्र हे पाणी गुलाबी झाल्याचे शास्त्रीय कारण नाही.

जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर असलेल्या लोणार सरोवरातील पाणी लाल झाले अशी अफवा वाऱ्यासारखी पसरताच गावातील काही नागरिकांनी पडताळणी केली असता सरोवरातील पाणी लाल नसून पावसाचे व गावातील सांडपाणी सरोवरात गेल्याने सरोवरातील पाणी गढूळ झाल्याचे दिसून आले आहे.

यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नसल्याचे दिसून आले आहे तसेच शहरातील सांडपाणी निरी प्रकल्पाच्या बाजूने सरोवरात जात असून प्रकल्प बंद अवस्थेत धूळखात पडलेला असल्याचे चित्र दिसत आहे. याकडे प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बातम्या आणखी आहेत...