आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मराठा आरक्षण:पोलिस भरती करण्यासारखे सध्या वातावरण नाही, हे मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखे- संभाजीराजे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील पोलिस विभागात 12 हजार 528 पदांसाठी पोलिस भरती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पण, या निर्णयावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'तुम्हाला मराठा समाजाला चिथावणी द्यायची आहे का?' असा प्रश्न करत आरक्षणावर तोडगा निघेपर्यंत पोलिस भरती करू नका, अशी मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत बोलताना संभाजीराजे म्हणाले की, 'हा निर्णय ऐकून मला दु:ख झाले आहे. पोलिस भरती करण्यासारखे सध्या वातावरण नाही. बहुजन समाजाने 58 मोर्चे काढले, ते यशस्वीही झाले. पण, आज मराठा समाज दुखी आहे. आपल्याला आरक्षण पुन्हा कसे मिळणार याकडे लक्ष केंद्रीत करायला हवे. नोकरभरती पुढच्या टप्प्यात करा, याची घाई करण्याची गरज नाही. तुम्हाला मराठा समाजाला चिथावणी द्यायचीय का? आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत भरती करू नका. इतर समाजाचे लोक समजून घेतील,' असे मत त्यांनी यावेळी बोलून दाखवले.

जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का? नितेश राणे

भाजप आमदार नितेश राणे यांनीही पोलिस भरतीवर टीका केली आहे. मराठा आरक्षण पुन्हा लागू होत नाही तोपर्यंत मेगा भरती करुन सरकार आगीत तेल टाकत असल्याचं ते म्हणाले. याबाबत त्यांनी ट्वीट केले की, "राज्यात इतिहासातली सर्वात मोठी मेगा भरती..मराठा आरक्षण स्थगित झाल्यावर ?? जो पर्यंत मराठा आरक्षण परत लागु होत नाही तो पर्यंत मेघा भरती कशाला ??? आगीत तेल टाकत आहात..जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे महाराष्ट्र सरकार करत आहे का??