आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • "There Will Be No Second Wave Of Corona In The State, But The State Government Will Be Able To Cope With The Situation," Said Health Minister Rajesh Tope

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाची दुसरी लाट:'राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार नाही, आलीच तर राज्य सरकार परिस्थितीशी सामना करण्यास सक्षम'- आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. अशातच राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तसेच, कोरोनाची दुसरी लाट आली तरी, राज्य सरकार पूर्ण तयारीत आहे, असेही टोपे म्हणाले.

टोपे म्हणाले की, 'युरोपियन देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे तिकडच्या देशांमध्ये परत लॉकडाऊन करण्यात आला. या संदर्भातल्या बातम्या आपण पाहतच आहोत. आपल्याकडेही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण, आपल्याकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. पण, जर कोरोनाची दुसरी लाट आलीच,तर राज्य सरकार त्या परिस्थितीशी तोंड देण्यास सक्षम आहे, असे टोपे यांनी सांगितले.