आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात:​​​​​​​चरणमाळ घाटात खाजगी बस पलटी झाल्याने तीस प्रवासी जखमी ; जखमींना रुग्णालयात हलवले

नंदुरबार19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघातांचा मार्ग म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील चरणमाळ घाटात प्रवाश्यांनी भरलेली खासगी बस पलटली.या भीषण अपघातात 8 ते 10 प्रवाशी गंभीर जखमी झाले असुन, बस खाली अडकलेल्या चालकाला मध्यरात्रीपर्यंत बाहेर काढण्याचे काम केले जात होते, जखमींना नवापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे बचाव मोहिमेत अनेक अडचणी आल्या.

पिंपळनेर कडुन सुरतकडे जाणारी बस चरणमाळ घाटातील तीव्र वळणावर पलटी झाली. मुसळधार पावसात रस्त्याचा अदांज न आल्याने ही बस पलटल्याची प्राथमिक माहिती आहे. बसमधे 30 प्रवासी प्रवास करत होते. प्रवाश्यांना काही कळायच्या आत बस अपघातग्रस्त झाल्याने एकच टाहो ऐकायला मिळत होता. लहान मुल आणि महिलांच्या रडण्याचा आवाज ह्रदय पिळवटून टाकणारा होता. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर 108 रुग्णवाहिकांनी अपघात स्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात आणले. रात्रीचा अंधार त्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने मदत कार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरीक,पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. सुदैवाने रात्री उशीरापर्यंत या अपघातात कोणाचा जीव गेला नाही. उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार केला जात आहे अपघात कसा झाला याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहे.

जखमींना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल
तीव्र वळणावर ब्रेक न लागल्याने बस दरीत मोठा दगडासह बस खालीच्या रस्त्यावर कोसळली. सर्व प्रवाशी झोपले होते दोन 108 रूग्णवहिका एक खाजगी रूग्णवहिकेच्या नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले चालकाला जीसीबीच्या साहाय्याने बाहेर काढले. तासाभरात चालकाला बाहेर काढले बस सटाण्याहून गुजरात राज्यातील जुनागड येथे जात होती. काही प्रवासी तर काही मजुर बस मध्ये होते. लहान मुले महिला एकूण 55 प्रवासी होते.

बातम्या आणखी आहेत...