आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज लागले. यात भाजपला सहापैकी फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. यावरुन आता भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांनी भाजपवर आणि फडणवीसांवर सडकडून टीका केली आहे. 'पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली. पारंपरिक मतदारसंघही भाजपने यावेळी गमावले. हे भाजपच्या नेतृत्वाचे अपयश आहे. अहंपणामुळेच ही वेळ आली आहे,' अशा शब्दांत खडसेंनी टीका केली.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल आज लागले. या निकालाबाबत एकनाथ खडसे यांनी सांगितले की, 'या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर मतदारसंघातील जागा गेली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुणे मतदारसंघाची जागा गेली. एखादा व्यक्तू पक्षातून बाहेर पडल्यावर काय फरक पडतो हे आता चंद्रकांत पाटलांना कळेल. निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. भाजपच्या नेतृत्वाने या अपयशाची जबाबदारी स्वीकारावी', असा घणाघात खडसेंनी केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.