आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतिक्रिया:'हे तीन पक्षांचे सरकार आहे, नामांतराच्या मुद्द्यावर एकत्र बसून चर्चा करू'- अजित पवार

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोध

महापालिका निवडणूक जवळ येत असल्यामुळे शहरांच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. यातच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील ट्वीटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्यानंतर काँग्रसने यावर आक्षेप नोंदवला आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीमधीलच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केले आहे. 'हे तीन पक्षांचे सरकार आहे. नामांतराच्या विषयी एकत्र बसून चर्चा करू आणि योग्य मार्ग काढू', असे पवार म्हणाले.

मुंबईत प्रसार माध्यमाशी बोलताना अजित पवार म्हणाले की, 'हे तीन पक्षांचे सरकार आहे. किमान समान कार्यक्रम आम्ही तिघांनी ठरवला आहे. तिघांचे सरकार चालवत असताना काही विषय कधी निघू शकतात. याबाबत एकत्र बसून चर्चा करुन योग्य पद्धतीचा मार्ग काढू. आज आमची बैठक आहे. या प्रकरणात नक्की काय झाले, जाणीवपूर्वक गडबड केली का या बाबी तपासल्या जातील,' असे पवार म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser