आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • This Time The View Of JEE And NEET Examination Centers Will Be Changed; Social Distance Will Apply And Will Be Checked By Handheld Machine

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एक्सप्लेनर:यावर्षी बदललेले असेल JEE आणि NEET परीक्षा केंद्राचे दृष्य; सोशल डिस्टेंसिंगसह हँडहेल्ड मशीनने होईल विद्यार्थ्यांची चेकींग

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरातील इंजीनियरिंग कॉलेजांमध्ये अॅडमिशनसाठी घेण्यात येणारी जॉइंट एंट्रेंस एग्जाम (JEE)-मेन्स 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान होईल. तर, देशभरातील मेडिकल कॉलेजांमध्ये अॅडमिशनसाठी होणारी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेंस टेस्ट (NEET) 13 सप्टेंबरला होईल. या परीक्षेवरुन सर्वत्र गोंधळ माजला आहे. सरकार आणि आयआयटीसह सर्व अभियांत्रीकी महाविद्यालयांना ठरलेल्या तारखेवरच परीक्षा घ्यायच्या आहेत. या परीक्षा ठरलेल्या वेळेवर न झाल्यास झिरो इअरचा धोका आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पालकांनीही NEET आणि JEE परीक्षा रद्द करण्याची विनंती केली आहे. याआधीच 3 मे रोजी होणारी NEET 26 जुलै आणि आता 13 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याप्रमाणे JEE परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली. मेन्सनंतर आयआयटीमध्ये अॅडमिशनसाठी अॅडवांस टेस्टही होणार आहे.

काय आहे NEET आणि JEE ?

NEET ला नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेंस टेस्ट म्हणतात. ही परीक्षा देशभरातील सरकारी आणइ खासगी मेडिकल आणि डेंटल कॉलेजांमध्ये अॅडमिशन मिळण्यासाठी घेतली जाते. देशभरातील 542 मेडिकल कॉलेजांच्या 80,055 जागांसाठी अॅडमिशन होते. 2012 मध्ये NEET ने सीबीएसईची AIPMT आणि राज्यांच्या वेगवेगळ्या परीक्षेच्या जागी सिंगल एंट्रेंस टेस्ट म्हणून जागा मिळवली होती.

JEE जॉइंट एंट्रेंस एग्जाम आहे, जी दोन टप्प्यात होते. मेन्सद्वारे देशभरातील एनआयटी, आयआयआयटी आणि इतर सरकारी-खासगी इंजीनियरिंग कॉलेजांमध्ये प्रवेश दिला जातो. याच प्रकारे मेन्स क्लीअर करणाऱ्यांना अॅडवांस देण्याची संधी मिळते, ज्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना आयआयटीमध्ये प्रवेश दिला जातो.

JEE मेन्सद्वारे 2.50 लाख विद्यार्थी क्वालिफाय होतील, जे 27 सप्टेंबरला JEE अॅडवांस्डमध्ये भाग घेऊ शकतील. यासाठी JEE मेन्सचा रिजल्ट म्हणजेच 11 सप्टेंबरपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल. JEE अॅडवांस्डचा रिजल्ट 5 ऑक्टोबरला घोषित होईल.

NEET आणि JEE वरुन गोंधळ का होत आहे ?

अनेक विद्यार्थी आणि पालकांनी केंद्र सरकारकडे कोरोना महामारीमुळे दोन्ही परीक्षा रद्द करण्याची अपील केली आहे. याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी याविषयावर चर्चाही केली.

झारखंड, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीदेखील या बैठकीत सहभागी झाले होते. यात सर्वांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. बंगाल, महाराष्ट्रासह 6 राज्यांनी सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटीशनदेखील दाखल केली आहे. ग्लोबल क्लायमेट एक्टविस्ट ग्रेटा थनबर्गनेही ट्वीट करुन एंट्रेंस टेस्टला योग्य नसल्याचे म्हटले आहे.

दुसरीकडे, देशभरातील 100 पेक्षा जास्त शिक्षकांनी एंट्रेंस टेस्टचे समर्थन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीले आहे. आयआयटीचे डायरेक्टरदेखील एंट्रेंस टेस्ट लवकरात लवकर करण्याची मागणी करत आहेत.

यावर सुप्रीम कोर्टाने काय म्हणले ?

सुप्रीम कोर्टाने 17 ऑगस्टला NEET आणि JEE मेन्स एंट्रेंस रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली होती.

11 राज्यांच्या विद्यार्थ्यांनी JEE आणि NEET स्थगित करण्याची मागणी केली होती. याचिकेत म्हटले होते की, देशभरातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेतल्या जाऊ नयेत.

एंट्रेंस टेस्टच्या व्यवस्थेवर सरकारचे म्हणने काय आहे?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल टेस्टिंग एजेंसीने गाइडलाइन जारी केल्या आहेत. जेईई परीक्षेसाठी 8.58 लाखांपैकी 7.5 लाख कँडिडेट्सनी अॅडमिट कार्ड डाउनलोडदेखील केले आहेत. नीटसाठी 15.97 लाखांपैकी 10 लाख विद्यार्थ्यांनी कार्ड डाउनलोड केले आहेत.

NEET आणि JEE ची परीक्षा केंद्र वाढवली आहेत. JEE 570 केंद्रांऐवजी आता 660 ठिकाणी होईल. NEET देखील 2546 ऐवजी 3842 केंद्रांवर होईल. विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेली केंद्रच देण्यात आली आहेत.

केंद्रांवर व्यवस्था कशी असेल ?

NEET आणि JEE केंद्रांवर हातांऐवजी हँडहेल्ड मशीनद्वारे तपासणी केली जाईल.

NEET परीक्षेत एक क्लारुममध्ये 24 ऐवजी 12 विद्यार्थी बसवले जातील. विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवले जाईल. JEE मध्ये एस सीट सोडून विद्यार्थ्यांना बसवले जाईल. सेंटरवर प्रत्येक विद्यार्थ्याला नवीन मास्क आणि ग्लोव्ज दिले जाईल.

एग्जामिनेशन हॉलबाहेर सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी विद्यार्थ्यांची एंट्री आणि एक्झीट वेगवेगळ्य ठिकाणी असेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser