आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यानंतर विरोधकांकडून चंद्रकांत पाटलांवर टीकेची झोड उठली. यातच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटील यांचा फटकारले आहे. 'महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना ते काय बोलताय याचे त्यांना भान राहिले नाही. शरद पवारांना जे छोटे नेते म्हणत आहे, त्यांना राजकारणाची उत्तुंगता पाहणे झेपले नाही', अशी प्रतिक्रिया राऊत यांनी व्यक्त केली.
मुंबईत पत्रकारांशी संवाध साधत असताना राऊत म्हणाले की, 'शरद पवारांना छोटे नेते म्हणणाऱ्यांना राजकारणाची उत्तुंगता पाहणे झेपले नाही. मोदी सरकारने शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे, हे बहुदा चंद्रकांत पाटलांना माहिती नसावे. पंतप्रधान मोदी हे शरद पवार यांच्याकडून मार्गदर्शन घेत होते, हे ही लक्षात घ्यावे', असा टोला राऊत यांनी पाटलांना लगावला. तसेच, 'राजकारण करताना मोठ्या नेत्यांबद्दल व्यक्तिगत स्तरावर इतक्या खालच्या स्तराला जावून बोलू नका,' असा सल्लाही राऊत यांनी दिला.
पहाटेच्या शपथविधीवर प्रतिक्रिया यावेळी राऊत यांनी मागच्या वर्षी फडणवीस आणि अजित पवारांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीवरही प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले की, 'ती पहाट नव्हती, तो अंधकारच होता. त्या अंधकारामध्ये सत्तेची प्रकाशकिरणे परत कधीच दिसणार नाहीत. चार वर्षाने परत आम्हीच जिंकणार. पहाटे पहाटे मला जाग आली, ते अजून झोपलेले नाहीत. त्या पहाटेनंतर त्यांना धक्के बसलेत, ते अजून सावरलेले नाहीत,' असा राऊतांनी भाजपला टोला लगावला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.