आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:जिल्हयात अफवा पसरविणाऱ्यांची गय केली जाणार नाही : पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांचा इशारा

हिंगोली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीकरांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता शांततेची परंपरा कायम ठेवावी, मात्र विनाकारण अफवा पसरविणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी दिला आहे.

त्रिपुरा घटनेचे राज्यात काही ठिकाणी पडसाद उमटल्यानंतर पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना आवश्यक त्या सुचना केल्या आहेत. संवेदनशील भागात वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या सोबतच पोलिस गस्तही सुरु ठेवण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्याला शांततेती परंपरा आहे, सर्व नागरीक एकतेच्या भावनेतून राहतात. त्यामुळे हिंगोलीकरांनी कुठल्याही अफवेला बळी न पडता शांततेची परंपरा कायम ठेवावी. मात्र विनाकारण अफवा पसरविणाऱ्यांवर कडक करवाई केली जाणार आहे. या सोबतच सायबर सेलच्या माध्यमातून सोशल मिडीयावर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. व्हॉटस्‌अप, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चुकीच्या व कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावणाऱ्या पोस्ट कोणीही टाकू नये. सायबर सेलची अशा प्रकारच्या संदेशावर नजर असून चुकीच्या व धार्मिक भावना दुखावणारे संदेश पाठविणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अफवा पसरविणाऱ्यांची गय केली जाणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

यासोबतच नागरीकांनीही कुठल्याही अफवांना तसेच सोशल मिडीयावरील चुकीच्या संदेशाला बळी न पडता शांतता व जातीय सलोखा कायम ठेवावा असे आवाहन पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...