आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धा:हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या आंदोलनकर्त्यांकडून पेट्रोल पंप हटावचा नारा, पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलीस विभागाच्या वतीने सुरु करण्यात येणारा पेट्रोल पंप हटावचा नारा हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या आंदोलनकर्त्यांकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे देण्यात आला.

बेकायदेशीर पद्धतीने पोलीस विभागाने पेट्रोल पंपाला मंजुरी मिळवली. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पेट्रोल पंपाचे बांधकाम सुरु असून ते बांधकाम थांबविण्यात यावे व पेट्रोल पंपाची जागा बदलण्यात यावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या विरोधात पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. स्वातंत्र्य दिनानिमित्त बजाज चौक येथून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या आंदोलन कर्त्यांकडून पेट्रोल पंप हटावचा नारा देण्यात आला. यावेळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केली तर इतरांनी पोलीस विभाग, जिल्हा प्रशासन व राज्य शासनाचा निषेध नोंदवला. या मोर्चात जिल्ह्यातील समाज बांधव व नागरिक उपस्थित झाले होते.

पोलीस विभागाच्या वतीने या आंदोलनात कुठल्याही प्रकारची घटना घडू नये यासाठी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदोबस्तात जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, उपपोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांच्यासह ७०० अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...