आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी:सेल्फीच्या नादात पती-पत्नी व त्यांच्या मित्राचा तलावामध्ये बुडून मृत्यू; काही महिन्यांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह, बीडमधील घटना

वडवणी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहेरी आलेल्या मुलीसह तिचा पती व पतीच्या मित्राचा सेल्फीच्या नादात तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना कवडगाव (ता. वडवणी) येथे शनिवारी सायंकाळी घडली. ताहा शेख ( २२) या कवडगाव येथील मुलीचा ढाकरगाव (ता. अंबड, जि. जालना) येथील सिद्दीक शेख यांच्याशी काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. शनिवारी हे नवदांपत्य कवडगाव येथे आले होते. सोबत सिद्दीक यांचा मित्र शहाब शेख (रा. बिहार) हाही होता. शनिवारी सायंकाळी हे तिघे गावातील तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले होते. सेल्फी काढण्यासाठी तिघे तलावात गेले. फोटो काढण्याच्या नादात तिघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तलावातून मृतदेह बाहेर काढले.

मुले बचावली?
तिघांसोबत तलाव परिसरात फिरायला नातेवाइकांची दोन मुलेही गेली होती. ही मुले बचावली असल्याची चर्चा सुरू होती. मात्र याची अधिकृत खात्री होऊ शकली नाही.

बातम्या आणखी आहेत...