आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:विविध ठिकाणी विजा कोसळून तीन ठार, मृतांत 11 वर्षीय शाळकरी मुलाचा समावेश

नांदेड7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड जिल्ह्यात शनिवारी विजा कोसळून किनवट तालुक्यातील एक शाळकरी विद्यार्थी, तर लाेहा तालुक्यामध्ये दाेन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

नांदेड जिल्ह्यातील कोसमेट (ता. किनवट) येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी सुशांत गजानन कामीलवाड व तनमन देविदास वाघमारे हे (दोघेही ११ वर्षीय) शनिवारी दुपारी शाळेतून घरी गेल्यानंतर बकऱ्या घेऊन गावालगतच्या शेतात चारत होते. दुपारी २ वाजता विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. ते दोघे आसरा घेण्यासाठी एका झाडाखाली थांबले. सुशांतच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तनमन हा गंभीर जखमी झाला. दुसऱ्या घटनेत लोहा तालुक्यातील रिसनगाव व अष्टूर येथे शनिवारी दुपारी ४ वाजता अंगावर वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शेतकरी बालाजी बापूराव पवार (४०) व महिपती दत्ता म्हेत्रे (१९) अशी मृतांची नावे आहेत. रिसनगाव येथील शेतकरी पवार हे शेतात काम करत होते. अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

शेतकरी बालाजी पवार हे शेतात काम करीत असताना त्यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला, तर दुसरी घटना अष्टूर येथे शेतकरी महिपती म्हेत्रे हे ही शेतात काम करीत असताना त्यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. लोहा ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...