आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंढरपूर रेल्वेस्थानकापासून ८०० मीटरवर लक्ष्मी टाकळी रोड रेल्वेमार्गावर रुळांवरून जाणाऱ्या ४ परप्रांतीय मजुरांना रेल्वेची धडक बसली. यात तिघांचा मृत्यू झाला तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृत मजूर छत्तीसगडमधील आहेत.पंढरपूर शहरात छत्तीसगडमधील १५ ते २० मजुरांची टोळी विविध बांधकामांवर काम करीत आहेत. ते उमा महाविद्यालय परिसरातील एका बांधकामाच्या ठिकाणी राहत आहेत. यांच्यापैकी काही जण बुधवारी पहाटे उठून रेल्वेस्टेशनच्या दिशेने गेले होते. हे लोक स्टेशनपासून सुमारे ८०० मीटर अंतरावर जुन्या टाकळी रेल्वे गेटजवळ रुळावरून चालत जात होते.
त्याच वेळी भरधाव आलेल्या मालगाडीने त्यांना उडवले असल्याचा रेल्वे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे . मात्र ही घटना सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. जिथे घटना घडली ते ठिकाण निर्मनुष्य असून रुळाच्या दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंत बांधली असल्याने सकाळी उशिरापर्यंत ही घटना समोर आली नाही. दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. या घटनेत हेमलाल गोविंद ठाकूर ( २९, रा. खजरी ता.खैरागड, जि.राजनांदगाव) आणि पंकज रामचरण मिरवी ( २३ वर्षे, बिरखा पो.गंडई, जि. राजनांदगाव, छत्तीसगड ) हे दोन जण जागीच ठार झाले, तर सोनू तुलाराम यादव ( १८ वर्षे) गोकुळ फुलसिंग मिरवी ( रा.विरखा गंडई, जि राजनांदगाव, छत्तीसगड ) हे गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी दोन्ही जखमींना आधी पंढरपूर सामान्य रुग्णालय येथे आणि नंतर तेथून सोलापूर येथे उपचारासाठी हलवले. दरम्यान, सोलापूर येथे डॉक्टरांनी सोनू यादव यास मृत घोषित केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.