आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:राज्यातील 1 लाख शिकलकरी समाजावर उपासमारीची वेळ, समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची बावरी यांची मागणी

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात सुमारे एक लाख शिकलकरी समाज आहे.

राज्यात विखुरलेल्या स्वरूपात असलेल्या सुमारे एक लाख शिकलकरी समाजाचे व्यवसाय बंद पडले असून उदनिर्वाहासाठी शेती नाही अन् राहण्यासाठी घरही नाही. या परिस्थितीत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आता दिल्लीच्या शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट समितीनेच या समाजाला मुख्य प्रवाहात आणावे, अशी अपेक्षा केली जात असून यासंदर्भातील निवेदनही शीख शिकलकरी समाज संघटनेचे मुख्य प्रवर्तक ठाकूरसिंग बावरी यांनी समितीकडे दिले आहे.

राज्यात सुमारे एक लाख शिकलकरी समाज आहे. लोखंडी कढई, झारे, विळे बनवून त्याची विक्री करण्याचा पारंपरिक व्यवसाय या समाजाचा आहे. ग्रामीण भागातून तसेच आठवडी बाजारातून या साहित्याची विक्री करून त्यावर येणाऱ्या पैशातून या समाजाला उदरनिर्वाह करावा लागतो. या व्यवसायाव्यतिरिक्त समाजाकडे दुसरे कुठलेही उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, या समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीही प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे समाजातील मुले, मुली उच्च शिक्षण घेऊ शकत नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात शीख शिकलकरी समाज संघटनेचे मुख्य प्रवर्तक ठाकूरसिंग बावरी यांनी दिल्ली येथे शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट समितीचे प्रधान सरदार मनजिंदरसिंघ सिरसा यांची भेट घेतली. या वेळी शिकलकरी समाजाच्या समस्यांबाबत चर्चा करून निवेदनदेखील दिले. या वेळी सरदार मनजिंदरसिंघ यांनी राज्यातील नव्हे, तर देशातील शिकलकरी समाजाची माहिती व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नियोजन करण्याचे आश्वासन दिले.

या केल्या आहेत मागण्या
यासंदर्भात ठाकूरसिंग बावरी यांनी निवेदनाद्वारे विविध मागण्या मांडल्या. यामध्ये समाजातील कुटुंबांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होण्यासाठी चार एकर जमीन उपलब्ध करून द्यावी, लोखंडी साहित्य बनवण्याचा व्यवसाय बंद पडल्याने त्यांना नवीन उद्योगाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, उद्योग-व्यवसायासाठी कर्ज द्यावे, राहण्यासाठी घरकुल बांधून द्यावे.

बातम्या आणखी आहेत...