आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:महाविकास आघाडीच्या नेत्यांचे डोके तपासून घेण्याची वेळ, चंद्रकांत पाटील यांचे मंत्री विजय वडेट्टीवारांवर टीकास्त्र

परभणी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीतील नेत्यांचे डाेके तपासून घेण्याची वेळ आली आहे. ज्याला जे वाटते ते ताे बाेलत सुटला असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कानात सांगितल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी म्हटले हाेते. या विधानाचा पाटील यांनी समाचार घेतला.

नितीन गडकरी हे आमचे नेते, आमचे पालक आहेत, ते आमची सगळ्यांची काळजी घेतात. मात्र वडेट्टीवारांनी असे विधान का केले, याबद्दल माहिती नसल्याचे ते म्हणाले. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले असताना त्यांना मदत अद्याप मिळाली नाही. पीक विम्याची भरपाईही दिली गेली नाही. हे सरकार संवेदनाशून्य असल्याने शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करावी लागणार असल्याचे ते म्हणाले. सरकार पडेल असे वाटत असल्याने नवाब मलिक शाहरुख खानच्या मुलाची वकिली करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेत त्यांनी संवाद साधला. पत्रकार परिषदेला माजी आ. विजय गव्हाणे, आ. मेघना बोर्डीकर, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, गणेशराव रोकडे आदींची उपस्थिती होती.

परभणी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी निवडणुकांसाठी संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...