आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मराठा आरक्षण:'महाभकास आघाडी सरकारला आरक्षण टिकवता आलं नाही', मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर चंद्रकांत पाटलांचे सरकारवर टीकास्त्र

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'महाभकास' आघाडी सरकारला मराठा आरक्षण टिकवता आले नाही- पाटील

सुप्रीम कोर्टात आज मराठा आरक्षणावर सुनावणी झाली. यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'महाभकास आघाडीला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आले नाही', असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या निर्णयावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आमच्या सरकारने आरक्षण दिले. आरक्षण काही महिन्यांसाठी टिकले पण नंतर स्थगिती मिळाली. आम्ही कायमस्वरूपी मराठा आरक्षण टिकण्यासाठीचे प्रयत्न केले. आम्ही शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले. मात्र महाभकास आघाडीला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आले. महाराष्ट्राच्या इतिहासातील मराठा समाजाच्या आयुष्यातला हा काळा दिवस आहे.'

'आम्ही सरकारला सांगत होतो की जरा गांभीर्याने या प्रकरणाकडे लक्ष द्या. पण अशोक चव्हाण यांना ते काही जमले नाही. सरकारने स्थगिती घेऊन स्वतःवर कुऱ्हाड मारून घेतली. दहा टक्के आर्थिक आरक्षण खंडपीठाकडे गेले पण स्थगिती नाही, तामिळनाडूत आरक्षणाला स्थगिती नाही. मग आपल्या सरकारला हे का नाही जमले? आम्ही स्वस्त बसणार नाही', अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली.

0