आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षता:एक लाख अंगणवाडी सेविकांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे प्रशिक्षण; संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी

हिंगोली14 दिवसांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • राज्यात 01 लाख अंगणवाडी सेविका यात कार्यरत; 1.08 लाख अंगणवाड्या राज्यात आहेत

राज्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव बालकांना होणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन राज्याच्या महिला व बालविकास विभागाने राज्यातील १ लाख अंगणवाडी सेविकांना ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटरचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यापासून हे प्रशिक्षण सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यात कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या लाटेमध्ये बालकांवर परिणाम जाणवणार असल्याची भीती असून शासनाने आरोग्य यंत्रणा तसेच इतर प्रशासकीय यंत्रणांना नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राज्यात बालरोगतज्ज्ञ व तज्ज्ञ कर्मचारीदेखील कमी आहेत. त्यामुळे शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना पोषण आहार तसेच प्राथमिक शिक्षणाचे काम केले जाते. त्यामुळे अंगणवाडी सेविका व बालकांचे एक वेगळेच नाते निर्माण झाले आहे.

बालकांना प्राथमिक स्तरावर उपचार मिळावेत यासाठी अंगणवाडी सेविकांनाच ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व बायपॅप मशीनचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिल्या आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावरील महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संपर्क साधून प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवसांतच १ लाख अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण दिले जाईल.

बातम्या आणखी आहेत...