आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पोलिसांच्या बदल्या:राज्यातील 45 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस दलातील बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी झाला करण्यात आला आहे. यात, नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (कायदा व सुव्यवस्था) आणि मिलिंद भारंबे (गुन्हे) यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.

मागील काही दिवसांपासून अधिकाऱ्यांच्या बदल्याचे सत्र सुरू आहे. यातच पोलिस दलातील बदल्यांची वाट सर्वजण पाहत होते. अखेर पोलिस दलातील बदल्या करण्यात आल्या. राज्यात एकूण 45 जणांच्या बदल्यांच्या आदेशावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वाक्षरी केली. नाशिकला विश्वास नांगरे पाटील यांच्या जागी नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी दीपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे. तर, विनयकुमार चौबे यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक) येथे नियुक्ती झाली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून के. व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलिय आयुक्त विवेक फणसळकर यांना आहे तेथेच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या दोन प्रमुख शहरांत नवे पोलिस आयुक्त येणार नाहीत.

पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती झाली आहे. तसेच, मनोजकुमार लोहिया यांच्याकडे कोल्हापूर महानिरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रताप दिघावकर यांची नियुक्ती नाशिक परीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक म्हणून झाली आहे. नाशिकचे महानिरीक्षक चेरिंग दोर्जे यांची तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे.

नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी बिपीनकुमारसिंह यांची नियुक्ती झाली आहे. अमरावतीच्या आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे.