आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा बदली:तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदाची जबाबदारी

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची परत एकदा बदली झाली आहे. मुंढे आता मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून कामकाज पाहतील. दरम्यान, कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंढे सध्या आयसोलेशनमध्ये आहेत.

नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी निवड झाल्यापासूनच मुंढे यांचे नगरसेवकांशी वाद सुरु झाला होता. सर्वपक्षीय नगरसेवकांचा तुकाराम मुंढे यांना विरोध होता. मुंढे यांनी शहरात कडक निर्बंध आणले होते. यावरुन नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि तुकाराम मुंढे असा वादही पाहायला मिळाला होता. अखेर मुंढेची बदली झाली आणि आता ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदाचा कारभार सांभाळतील. दरम्यान, मुंढे यांच्या जागी राधाकृष्णन बी यांची नागपूरच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.