आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोली:जल, जंगल, जमिनीचे रक्षण करणारे आदिवासीच देशाचे खरे मालक- शरद पवार; केंद्रावरही सडकून टीका

प्रतिनिधी / गडचिरोली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात नुकताच आदिवासींच्या सन्मानार्थ मोठा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, त्यात आदिवासी हा शब्दप्रयोग गाळून वनवासी हा शब्दप्रयोग करण्यात आला. हा देशातील आदिवासींचा अपमान असून जल, जंगल, जमिनीचे रक्षण करणारे आदिवासीच देशाचे खरे मालक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा जेष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.

ते देसाईगंज येथील तालुका क्रिडा संकुलनाच्या भव्य आवारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजीत शेतकरी, शेतमजूर व कामगार मेळावा आणि पक्ष कार्यकर्ता प्रवेश कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होते. शरद पवार पुढे म्हणाले की, केंद्रातील सत्ताधारी सत्तेचा दुरुपयोग करीत देशाला प्रगतीकडे नेण्याऐवजी जातीपातीचे राजकारण करीत आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही आपली ठाम भुमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पक्षाने परवानगी दिल्यास गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राची निवडणुक लढवून विजय खेचून आणण्यास तयार असल्याचे प्रतिपादन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव आत्राम यांनी केले. दरम्यान कार्यक्रमाचे औचित्य साधून भाजपचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती नाना नाकाडे यांनी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचा दुपट्टा परिधान करुन आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

राज्यातील नेत्यांना जरी स्वबळाची घाई झाली असेल तरी...​​​​​​​

त्रिपुराच्या घटनेचे महाराष्ट्रात पडसाद उमटणे अनुचित आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा अतिरिक्त बोजा पडू नये, यासाठी उपाययोजना करण्याचे काम राज्य सरकार करेल. प्रसंगी कर्ज काढावे लागले तरी बेहत्तर. गडचिरोलीचा पूर्वीपेक्षा बराच विकास झाला आहे, नक्षलवाद कधी संपेल हे मी सांगू शकत नाही, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. तर प्रत्येकाला आपापल्या पक्षाची ताकद वाढविण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना जरी स्वबळाची घाई झाली असेल तरी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची एकत्रित निवडणुका लढण्याची भूमिका असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...