आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • TRP Scam News And Updates; Arnab Goswami And Partho Dasgupta | Republic TV Chief Arnab Paid Rs 40 Lakh To Former BARC CEO Partho Dasgupta

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ:TRP वाढवण्यासाठी गोस्वामींनी तीन वर्षात 40 लाख रुपये दिल्याचा BARC च्या माजी CEO चा दावा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
BARC चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा अटकेदरम्यान काढलेला फोटो. - Divya Marathi
BARC चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा अटकेदरम्यान काढलेला फोटो.
  • सप्लीमेंट्री चार्जशीटमध्ये झाला खुलासा

TRP स्कॅम प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात अटक झालेले ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउंसिल (BARC) इंडियाचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले की, 'TRP वाढवण्यासाठी अर्णब गोस्वामी यांनी तीन वर्षात त्यांना 40 लाख रुपये दिले.'

दासगुप्ताने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले की, 'मी अर्णब गोस्वामींना 2004 पासून ओळखतो. आम्ही टाइम्स नाउमध्ये सोबत काम करायचो. मी 2013 मध्ये BARC चा सीईओ झालो. अर्णब गोस्वामींनी 2017 मध्ये रिपब्लिक लॉन्च केले. रिपब्लिक टीव्हीच्या लॉन्चिंगपूर्वीच गोस्वामींनी मला याबाबत माहिती दिली होती. तसेच, चॅनेलसाठी चांगली रेटींग देण्यासाठी मदत मागितली होती. गोस्वांमींना माहिती होते की, मला टीआरपी सिस्टीमबद्दल चांगली माहिती आहे.'

'मी TRP रेटिंगमध्ये फेरफार करुन रिपब्लिक टीव्हीला नंबर 1 रेटिंग मिळवून दिली. हा प्रकार 2017 ते 2019 पर्यंत सुरू होता. या बदल्यात 2017 मध्ये अर्णबने मला फ्रांस व स्विट्जरलँड फॅमिली ट्रिपसाठी 6000 डॉलरदेखील दिले. 2019 मध्येही अर्णबने स्वीडन आणि डेनमार्क ट्रिपसाठी 6000 डॉलर दिले होते. या व्यतिरिक्त 2017 मध्ये अर्णबने मला ITC परेल हॉटेलमध्ये बोलावून 20 लाख रुपये दिले. यानंतर 2018 आणि 2019 मध्येही 10-10 लाख रुपये दिले.'

सप्लीमेंट्री चार्जशीटमध्ये झाला खुलासा

मुंबई पोलिसांनी 11 जानेवारीला न्यायालयात दाखल केलेल्या 3,600 पानांच्या पुरवनी याचिकेत हा दावा करण्यात आला की, अर्णब यांनी दासगुप्ताला दोन फॅमिली ट्रिपसाठी 8,75,910 रुपये दिले होते. चार्जशीटमध्ये BARC च्या एका फॉरेंसिक ऑडिट रिपोर्टला सादर करण्यात आले. यात दासगुप्ता आणि अर्णबदरम्यान झालेले व्हॉट्सअॅप चॅट आणि माजी काउंसिल कर्मचारी आणि केबल ऑपरेटरसह 59 लोकांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या.

आतापर्यंत 12 जणांना अटक

मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक केली आहे. यात दासगुप्ताशिवाय BARC चे माजी COO रोमिल रमगढ़िया आणि रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सीईओ विकास खानचंदानी सामील आहेत. मुंबई पोलिसांनी या लोकांविरोधात 2020 मध्ये प्रकरण दाखल करुन घेतले आणि पहिली चार्जशीट नोव्हेंबर 2020 मध्ये दाखल झाली. दुसऱ्या चार्जशीटनुसार, दासगुप्ता यांचे स्टेटमेंट 27 डिसेंबर 2020 ला क्राइम इंटेलिजेंस यूनिटच्या ऑफीसमध्ये साक्षीदारांच्या उपस्थितीत नोंदवण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...