आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुरीचे भाव क्विंटलमागे तब्बल 9 हजारांच्या घरात गेलेत. अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज तुरीला क्विंटलमागे 6 हजार ते चक्क 8 हजार 830 रुपयांचा भाव मिळाला.
मात्र, उत्पादनात घट झाल्याने तुरीची आवक कमी झाल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात तूर दाळीचे भावही वाढण्याचे संकेत आहेत. अकोला बाजारपेठेत मंगळवारी एक हजार 21 इतक्या क्विंटलची तूर खरेदी झाली.
अशी भाववाढ...
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरुवातीला तुरीचे भाव घसरले. क्विंटलमागे साधारणतः सात ते साडेआठ हजारांचा दर मिळाला. त्यानंतर पाच तारखेला क्विंटलमागे चारशे रुपयांची वाढ झाली. त्यानंतर ही भाववाढ सुरूच असून आज क्विंटलमागे 60 रुपयांची पुन्हा वाढ झाली. तर हरभऱ्याला क्विंटलमागे चार ते साडेआठ हजाराच्या दरम्यान भाव मिळाला. तर स्थानिक गव्हाचे दर काहीसे कमी होते. क्विंटलमागे 1900 रुपयांपासून ते 2600 घरात हे भाव राहिले. राज्यात यंदा हरभऱ्याचा पेरा विक्रमी झाला. जवळपास तीस हजार हेक्टरवर या पिकाची पेरणी झाली. मात्र, अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी पिकाचे मोठे नुकसान झाले.
अवकाळीचे संकट...
एप्रिल महिना उजाडला तरी राज्यात अवकाळी पाऊस सुरूच आहे. येत्या 15 तारखेपर्यंत अशीच स्थिती राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे फळबागावर संकट कोसळले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात 1 मार्च ते 9 एप्रिल दरम्यान सर्वाधिक अवकाळी पाऊस महाराष्ट्रात झाल्याचे समोर आले. त्यात देशभरातील एकूण पावसापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 80 टक्के तर इतर ठिकाणी 28 टक्के पावसाची नोंद झाली.
मोठे नुकसान...
मार्च महिन्यात तीन वेळेस अवकाळी पाऊस झाला. त्यात 4 ते 9 मार्च या काळात गारपीट झाली. त्यामुळे 15 जिल्ह्यांतील 38 हजार 606 हेक्टर पिकाचे नुकसान झाले. त्यानंतर मार्च महिन्यात 15 ते 21 तारखेदरम्यान अवकाळी पाऊस झाला. त्याचा 30 जिल्ह्यांना फटका बसला. त्यामुळे 1 लाख 7 हजार हेक्टरवरचे पीक मातीमोल झाले. त्यानंतर झालेल्या पावसामुळे 28 हजार 287 हेक्टरवरच्या पिकाचे नुकसान झाल्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
संबंधित वृत्तः
खुशखबर:यंदा सरासरी पाऊसमान; अन्नधान्याचे उत्पादन चांगले होणार, महागाईपासूनही दिलासा मिळण्याची शक्यता
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.