आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पित्याला अखेरचा निरोप:लाडक्या पित्याला 12 मुलींनी दिला खांदा, कुटुंबात मुलगा नसल्याची उणीव भासू दिली नाही

मानोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पित्याला खांदा देऊन 12 मुलींनी कुटुंबात मुलगा नसल्याची उणीव भासू दिली नाही

अंत्यसंस्काराचे विधी म्हणजे खरे तर पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतीक. मात्र, वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील शेंदुरजना (आढाव) गावात पित्याच्या निधनानंतर अंतिम निरोप देताना त्यांच्या १२ मुलींनी खांदा दिला. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करणारे दानशूर सखाराम गणपतराव काळे (९२) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले. या पित्याला खांदा देऊन १२ मुलींनी कुटुंबात मुलगा नसल्याची उणीव भासू दिली नाही. हा प्रसंग पाहून उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या