आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:कामठा फाटा येथील अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणात मध्यप्रदेशातून दोघे पोलिसांच्या ताब्यात

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील कामठा फाटा शिवारातील विहिरीत सापडलेल्या अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणात आखाडा बाळापूर पोलिसांच्या पथकाने नरसिंगपुर ( मध्यप्रदेश ) येथून दोघांना सोमवारी ( ता. ८) पहाटे ताब्यात घेतले आहे.

राजस्थानातील येथील गुड्डू शहा हे त्यांच्या कुटुंबीयांसह मागील काही दिवसापासून कळमनुरी तालूक्यातील कामठा फाटा येथे वास्तव्यास आले होते.या ठिकाणी मनोरंजनाचा खेळ करून ते उदरनिर्वाह करत होते. ता. २२ फेब्रुवारी रोजी व त्यांची पत्नी बाहेर गावी गेले असताना त्यांच्या घरी असलेली रेश्मा गुड्डू शहा (९) हि अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली. गुड्डू शहा बाहेरगावाहून आल्यानंतर मुलगी घरात दिसली नाही. त्यानंतर मंगळवारी ता. २ दुपारच्या सुमारास कामठा फाटा शिवारातील ३३ केव्ही उपकेंद्राच्या पाठीमागे असलेल्या एका विहिरीत रेश्मा शहा (९) हिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरे तपासणीसाठी आखाडा बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. उत्तरीय तपासणीमध्ये रेश्माच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आगोदर तिचा खून केला अन त्यानंतरच तिचा मृतदेह विहीरीत टाकल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

दरम्यान या घटनेनंतर दोन दिवसानंतर गुड्डू शहा यांच्या सोबत असलेले दोघे जण कामठा फाटा येथून फरार झाले होते. पोलिसांनी त्याचे मोबाॅईल लोकेशन तपासले असता ते मलकापूर येथे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस पोहोचण्यापूर्वीच ते मलकापूर येथून फरार झाले. विशेष म्हणजे त्यांनी मोबॉईल सिम देखील तोडून टाकले व मोबॉईल विकून टाकला होता. दरम्यान पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास रोयलावार, जमादार संजय मार्के, पंढरी चव्हाण, टापरे यांच्या पथकाने राजस्थानातील टोक हे गाव गाठले. त्या ठिकाणी संशयित आढळले नाही. पोलिसांनी अधिक माहिती घेतल्यानंतर ते मध्यप्रदेशातील जबलपुर जवळ असलेल्या नरसिंगपूर या गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांचे पथक राजस्थानातून थेट मध्यप्रदेशात गेले. आज पहाटे पोलिसांनी शरीफ शहा व धर्मा जाधव या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या अधिक चौकशीतून रेश्मा शहा या अल्पवयीन मुलीच्या खुनाचा छडा लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...